बीजिंग: संपूर्ण जगाला वेठीस धरणाऱ्या करोना विषाणूच्या संसर्गाच्या उगमाचे स्रोत शोधण्यासाठी आणि त्या अनुषंगाने माहिती घेण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेचे एक पथक गुरुवारी चीनमधील वुहान शहरात दाखल झाले. वुहान शहरातूनच चीनमध्ये आणि संपूर्ण जगभरात फैलावला. डिसेंबर २०१९ मध्ये वुहानमध्ये पहिला करोनाबाधित आढळला.

१४ दिवस आयसोलेशनमध्ये राहणार?

जागतिक आरोग्य संघटनेचे संपूर्ण पथक सिंगापूरहून चीनमध्ये दाखल झाले आहे. यामध्ये १० तज्ज्ञांचा समावेश आहे. चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, जागतिक आरोग्य संघटनेचे पथक प्रत्यक्षपणे आपल्या कामाला सुरुवात करण्याआधी चीनमधील करोना नियंत्रणासाठी जारी करण्यात आलेल्या निर्देशांनुसार आयसोलेशनची प्रक्रिया पूर्ण करणार आहे. त्यामुळे १४ सदस्यीय पथकाला १४ दिवस आयसोलेशनमध्ये राहवे लागणार असून त्यांची कोव्हिड चाचणीही होण्याची शक्यता आहे.

वाचा:
वाचा: इतर देशांचाही दौरा करण्याची मागणी

चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी माध्यमांना सांगितले की, विषाणूचा उगम कोठे झाला, हा एक वैज्ञानिक प्रश्न आहे. या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी तज्ज्ञांनी इतर देशांचाही दौरा करण्याची आवश्यकता आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे पथक आयसोलेशनमध्ये असताना चीनचे तज्ज्ञ त्यांच्यासोबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा करणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

दरम्यान, चीनने करोनाबाबतची माहिती लपवली असल्याचा आरोप सातत्याने करण्यात येतो. चीनने या विषाणूबाबत फारसं गांभीर्य दाखवले नाही आणि त्याशिवाय संपूर्ण जगाला अंधारात ठेवल्यामुळे करोनाचा फैलाव झाला असल्याचा आरोप चीनवर करण्यात येतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या चौकशी पथकालाही चीनमध्ये प्रवेश नाकारण्यात आल्याचे वृत्त समोर आल्यानंतर या आरोपाला आणखीच बळ मिळाले होते. व्हिसाच्या तांत्रिक बाबींमुळे प्रवेश देण्यास अडचणी निर्माण झाल्याचे चीननेनंतर स्पष्ट केले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here