मुंबईः यांच्यावर बलात्काराचा आरोप झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या गोटात खळबळ उडाली आहे. भाजपनं मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काय भूमिका घेणार याबाबत चर्चांना उधाण येत आहे. या सर्व घडामोडींवर राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेनं बलात्काराचा आरोप केल्यानंतर राज्यातील राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते यांच्या जावयांना ड्रग्सप्रकरणी एनसीबीनं अटक केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन बड्या नेत्यांच्याबाबत या दोन महत्त्वाच्या घडामोडी घडल्यानं पक्ष काय भूमिका स्पष्ट करणार याकडे लक्ष लागून राहिलं आहे. अजित पवार यांनीही या घडामोडींवर भाष्य केलं आहे.

‘धनंजय मुंडे यांनी त्यांच्यावर झालेल्या आरोपांवर यापूर्वीच खुलासा केला आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनीही त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. मलिकांनी जी भूमिका मांडली तीच भूमिका राष्ट्रवादी पक्षाची आहे,’ असं सूचक वक्तव्य अजित पवार यांनी केलं आहे.

दरम्यान, या सगळ्या घडामोडींनंतर आज अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि जयंत पाटील यांची बैठक पार पडली. यावेळी या बैठकीत धनंजय मुंडे आणि नवाब मलिक यांच्याबाबत या बैठकीत चर्चा झाल्याचं सांगण्यात येतंय.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here