वाचा:
() येथे नवे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. मंत्रिमंडळाच्या या निर्णयाची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाच्या (CMO) ट्विटर अकाऊंटवरून देण्यात आली आहे. त्यात उस्मानाबादचा उल्लेख ‘धाराशीव’ (Dharashiv) असा करण्यात आला आहे. यापूर्वी औरंगाबादचा उल्लेख ‘संभाजीनगर’ करण्यात आला होता. त्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. तर, राष्ट्रवादी काँग्रेसनं सावध भूमिका घेतली होती. आता ‘धाराशीव’च्या उल्लेखावर राष्ट्रवादीनं रोखठोक भूमिका घेतली आहे.
‘औरंगाबाद व उस्मानाबादच्या नामांतराबद्दल शिवसेनेची भूमिका ठरलेली आहे. ती पूर्वीपासून आहे. शिवसेना दोन्ही शहरांचा उल्लेख संभाजीनगर व धाराशीव असा करते, ते आम्हालाही माहीत आहे. काँग्रेसचीही एक भूमिका आहे. तिन्ही पक्षांच्या भूमिका आपापल्या ठिकाणी आहेत. कुणी कुठल्या नावाचा आग्रह धरावा हा त्यांचा प्रश्न आहे. ते त्यांची मतं मांडू शकतात. सरकारशी त्याचा संबंध नाही. कारण, सरकार किमान समान कार्यक्रमावर बनलेलं आहे,’ असं पाटील म्हणाले.
वाचा:
‘उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असले तरी ते एका पक्षाचे प्रमुख आहेत. पक्षप्रमुख म्हणून असलेली त्यांची मतं त्यांनी सोडावीत, असा आमचा आग्रह कधीच नव्हता. त्यांची भूमिका नवी नाही,’ असंही पाटील म्हणाले.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times