ब्रिस्बेन, : ब्रिस्बेनमध्ये होणारा चौथा कसोटी सामना आता फक्त काही तासांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे या कसोटीमध्ये खेळपट्टी कशी असेल, पाऊस पडणार की नाही आणि या सामन्याचे लाईव्ह अपडेट तुम्ही कुठे पाहू शकता, या सर्व गोष्टी तुम्हाला फक्त एकाच क्लिवर पाहायला मिळतील.

ब्रिस्बेन कसोटी जो जिंकेल त्यांना मालिका जिंकता येणार आहे. त्यामुळे हा कसोटी सामना निर्णायक ठरणार आहे. या कसोटी सामन्याच्या पाचही दिवशी पाऊ पडू शकतो, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे या सामन्यात पाचही दिवशी पावसाचा व्यत्यय येणार आहे. पण पावसामुळे या सामन्यातील किती षटके कमी होतील, हे पाहावे लागेल. कारण पाऊस जर जास्त काळ पडला तर सामना अनिर्णीतही राहू शकतो. त्यामुळे या कसोटी सामन्यात किती षटकांचा खेळ होतो आणि त्यामध्ये कोण बाजी मारतं, हे पाहणे सर्वांसाठीच उत्सुकतेचे असणार आहे.

ब्रिस्बेन कसोटीसाठी खेळपट्टीही सर्वात महत्वाची ठरणार आहे. या खेळपट्टीवर चेंडूला जास्त उसळी मिळेल, असे म्हटले जात आहे. त्याचबरोबर फिरकीपटूंना या खेळपट्टीवर चांगली मदत मिळेल, असेही पाहायला मिळत आहे. त्यामुळे या सामन्यात फिरकीपटूंची भूमिकाही महत्वाची ठरणार आहे.

ऑस्ट्रेलियाच्या संघातील फिरकीपटू नॅथन लायनने हे मैदान चांगलेच गाजवलेले आहे. नॅथनने या मैदानात एकट्याने ३५ विकेट्स मिळवले आहेत. त्याचबरोबर मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स आणइ जोश हेझलवूड या तिघांनी मिळू ७४ बळी मिळवले आहेत. त्याचबरोबर १९८८ सालापासून ऑस्ट्रेलियाने या मैदानात एकही सामना गमावलेला नाही. त्यामुळे ऑस्ट्रेलियासाठी ही जमेची बाजू आहे, असे म्हटले जात आहे.

कुठे पाहाला लाइव्ह अपडेट…जर तुम्हाला या सामन्याचे लाइव्ह अपडेट पाहायचे असतील तर तुम्ही https://maharashtratimes.com/ ला भेट देऊ शकता. तुम्हाला लाइव्ह अपडेटबरोबरच अन्य क्रिकेटच्या महत्वाच्या बातम्याही तुम्हाला पाहता येऊ शकतात. त्यामुळे सामना सुरु झाल्यावर या वेबसाईटला अवश्य भेट द्या…

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here