मुंबई: वादग्रस्त ट्विट्स आणि वक्तव्यांमुळं चर्चेत असलेली अभिनेत्री हिनं तिच्या आणखी एका सिनेमाची घोषणा केली आहे. ‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी’या चित्रपटात झांसीच्या राणीचा इतिहास प्रेक्षकांना दाखवल्यानंतर आता आणखी एका राणीच्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

कंगनानं ट्विट करत तिच्या ‘मणिकर्णिका रिटर्न्स’ या चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटात कंगना काश्मीरच्या राणीचा इतिहास शौर्यगाथा प्रेक्षकांना दाखवणार आहे. चित्रपट निर्माते कमल जैन यांच्यासोबतचा फोटो शेअर करत कंगनानं या चित्रपटाची घोषणा केलीए. ‘झासीच्या राणीसारख्याच अनेक वीरांगना या भारत भूमित होऊन गेल्या. अशाच आणखी एका वीरांगनाची शौर्यगाथा घेऊन येतेय. काश्मीरची राणी जिनं एकदा नव्हे तर दोनदा महमुद गजनवीला पराभूत केलं.’, असं कंगनानं तिच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

कंगनाच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचं झालं तर सध्या तिनं‘थलायवी’ या चित्रपटाचं शूटिंग संपवलं आहे हा सिनेमा तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांचा बायोपिक असणार आहे. यानंतर कंगना लवकरच तिच्या ‘तेजस’ सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरुवात करणार असून यात ती भारतीय वायुसेनेच्या लढाऊ पायलटच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय ची ‘धाकड’ चित्रपटातही दिसणार असून यात ती अ‍ॅक्शन सीन करताना दिसणार आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here