वॉशिंग्टन: अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष यांच्याविरोधात महाभियोगाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मागील आठवड्यात अमेरिकेच्या संसदेत ट्रम्प समर्थकांनी केलेल्या हिंसाचारानंतर ट्रम्प यांची गच्छंती करण्याची मागणी करण्यात येत होती. विशेष म्हणजे ट्रम्प यांची राष्ट्राध्यक्षपदाची मुदत संपण्यास अवघे पाच दिवसच आहे. आपल्या वादग्रस्त कारकीर्दीची अखेरही वादग्रस्तच करणारे अमेरिकेचे मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कायम स्वरुपी बंदी आणण्याची मागणी करण्यात येत आहे. जेणेकरून भविष्यात ट्रम्प कोणत्याही पदावर येणार नाहीत. जाणून घेऊयात काही महत्त्वाचे मु्द्दे:

डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कायम स्वरुपी बंदी?

अमेरिकेच्या संविधानानुसार, एखाद्या व्यक्तीवर महाभियोगाची कारवाई केल्यास तर त्याला दोन पद्धतीने शिक्षा केली जाते. एक म्हणजे त्याच्याकडे असणारा पदभार काढून गच्छंती करणे, आणि दुसरी शिक्षा म्हणजे त्या व्यक्तीला कायमस्वरुपी कोणत्याही पदापासून दूर ठेवणे.

वाचा:

महाभियोगातून कारवाई करून पदावरून हटवण्यासाठी सिनेटमध्ये दोन तृतीयांश बहुमताने या प्रस्तावाला मंजूर करावे लागते. जर असे झाले तर त्यानंतर सिनेटमध्ये आणखी एक मतदान होईल. त्यानुसार या व्यक्तिला भविष्यात कोणतेही पद भूषवण्यापासून रोखले जाईल. अमेरिकेत अशा प्रकारची कारवाई आतापर्यंत तिघांवर झाली आहे. हे तिघेहीजण फेडरल कोर्टाचे न्यायाधीश होते.

सिनेटमध्ये बहुमत मिळाले नाही तर काय?

जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, सिनेटमध्ये महाभियोगावर मतदान होऊ शकते आणि त्यातून सध्या असलेल्या पदावरून हटवण्यात येऊ शकते. मात्र, सार्वजनिक पदावरून कायमस्वरूपी बंदी घालायची असेल तर त्याआधी एक सुनावणी होईल. त्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना आपली बाजू मांडण्याची संधी मिळेल. त्यात ते दोषी आढळल्यास पुढील कारवाईची प्रक्रिया सुरू होईल.

वाचा: डोनाल्ड ट्रम्प कोर्टात जाऊ शकतात का?

अमेरिकन संसदेने डोनाल्ड ट्रम्प यांना कोणत्याही पदासाठी अयोग्य सिद्ध केल्यास ट्रम्प कोर्टात दाद मागू शकतात. सुप्रीम कोर्ट अमेरिकन संसदेला या कारवाईबाबत स्पष्टीकरण मागू शकते. सध्याच्या परिस्थितीनुसार, सुप्रीम कोर्टातील नऊ न्यायाधीशांपैकी रिपब्लिकन न्यायाधीशांची संख्या अधिक आहे.

प्रतिनिधी सभेत प्रस्ताव मंजूर झाला, आता काय होणार?

अमेरिकेच्या प्रतिनिधी सभागृहाने डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात महाभियोगाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. आता हा प्रस्ताव सिनेटमध्ये पाठवण्यात येणार असून तिथे सुनावणी होईल.

वाचा:
सिनेटमध्ये काय होणार?

सध्याच्या कार्यक्रमानुसार, सिनेटचे पुढील सत्र १९ जानेवारी रोजी आहे. तर, २० जानेवारी रोजी डोनाल्ड ट्रम्प यांचा कार्यकाळ संपणार आहे. अशा स्थितीत ट्रम्प यांचा कार्यकाळ संपल्यानंतरच त्यांच्याविरोधातील महाभियोगाचा खटला सुरू होईल.

सिनेटमध्ये कोणाचे पारडं जड?
सिनेटमध्ये दोन तृतीयांश मतदानाची आवश्यकता भासणार आहे. सिनेटमध्ये मॅककॉनल हे रिपब्लिकन पक्षाचे प्रमुख आहेत. त्यांनी ट्रम्प यांच्याविरोधात मतदान केले तर अनेकजण त्यांच्यासारखाच निर्णय घेऊ शकतात. सध्या तरी रिपब्लिकन पक्षाने ट्रम्प यांना पद सोडण्याचा सल्ला दिला आहे. याआधीही ट्रम्प यांच्याविरोधात महाभियोगाचा प्रस्ताव आणला होता. मात्र, त्यावेळी ट्रम्प यांच्या बाजूने मतदान झाले.

ट्रम्प यांचे भवितव्य काय?

सिनेटमध्ये चालवण्यात येणाऱ्या खटल्यात ट्रम्प दोषी आढळल्यास त्यांना अयोग्य ठरवण्याबाबत मतदान करण्यात येईल. सध्याच्या परिस्थितीनुसार, ट्रम्प यांना पदावरून हटवण्यात यावे अशी अनेकांची भूमिका आहे. मात्र, भविष्यात कायमस्वरूपी बंदी घालावी याला अनेकांनी असहमती दर्शवली आहे.

ट्रम्प यांच्यावर आरोप काय?

ट्रम्प यांच्यावर याआधी युक्रेनच्या मुद्यावर महाभियोग चालवण्याता आला होता. तर, आता अमेरिकेत दंगल भडकवणे, संसदेवर हल्ला करण्यास चिथावणी देणे आदी आरोप लावण्यात आले आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here