मुंबई: नव्या वर्षात टीव्हीवर दाखल झालेल्या ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई’ या मालिकेबद्दल उत्सुकता आहे. या मालिकेत होळकर यांचे जीवनकार्य उलगडणार आहे. अहिल्याबाईंनी तत्त्कालीन रूढींना आव्हान देत महिला सशक्तीकरणाचा मार्ग कसा खुला केला, हे त्यात दाखवलं जाणार आहे.

या मालिकेत ही बालकलाकार अहिल्याबाई होळकरांची भूमिका साकारताना दिसणार आहे. या अनेक अर्थानं एक महान व्यक्ती होत्या. त्या खूप मोठ्या योद्धा आणि दूरद्रष्ट्या होत्या. त्या दयाळू आणि प्रेमळही होत्या. अनेकांना माहिती नसलेली गोष्ट म्हणजे, अहिल्याबाई होळकरांना प्राणी खूप आवडत असत. त्या त्यांची खूप काळजी घेत. अहिल्याबाईंच्या स्वभावातील ज्या गोष्टी आतापर्यंत सामान्यांना माहिती नाहीत, त्यावर प्रकाश टाकण्याचा या मालिकेचा उद्देश आहे.

विशेष म्हणजे, अहिल्याबाई होळकरांचे पात्र साकारणारी अदिती जलतरे ही देखील प्राणीप्रेमी आहे. चित्रीकरणादरम्यानदेखील, अदिती सेटवरील प्राण्यांसोबत खेळत अशते. घरून आणलेले अन्न प्राण्यांना खाऊ घालत असते.

प्राण्यांवरील प्रेमाबद्दल बोलताना अदिती जलतरे म्हणाली, ‘अहिल्याबाईंना प्राण्यांची खूप आवड होती, हे कळाल्यावर मला खूप आनंद झाला. त्यामुळं त्यांचं व माझं खूप घट्ट नातं असल्यासारखं वाटलं. त्यांच्या या आवडीसोबत माझी आवड खूप मिळतीजुळती आहे. माझ्या आईने तर अहिल्याबाई आणि माझ्यामधील समान असलेल्या आणखी काही गोष्टी दाखवल्या. मी त्यांच्याबद्दल खूप प्रश्न विचारत असते, त्यांच्यासारखंच शिकण्याची माझी इच्छा आहे. त्या सर्वार्थानं असामान्य व्यक्ती होत्या. ऐतिहासिक अशा पडद्यावर साकारणे हा खरोखरच माझ्यासाठी सन्मान आहे. ‘

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here