न्यूयॉर्क: करोनाच्या संसर्गाशी दोन हात करत असलेल्या अमेरिकेने आता मोठा निर्णय घेतला आहे. अमेरिकेत दाखल होणाऱ्या प्रवाशांना यापुढे करोनामुक्त असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. अमेरिकेच्या ‘द सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रीव्हेन्शन’चे (सीडीसी) संचालक रॉबर्ट रेडफिल्ड यांनी हे निर्देश दिले आहेत. २६ जानेवारीपासून या नियमाची अंमलबजावणी होणार आहे.

ब्रिटनमध्ये गेल्या महिन्यात ‘कोव्हिड २१’ हा नवा विषाणू आढळला होता. यानंतर ब्रिटनमधून अमेरिकेत येणाऱ्या प्रवाशांसाठी हा नियम आखण्यात आला होता. सुरक्षेच्या कारणास्तव या नियमाची व्याप्ती वाढवण्यात आली असून, आता सर्व देशांतील प्रवाशांना २६ जानेवारीपासून करोना निगेटिव्हचे प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे.

‘अमेरिकेत येऊ इच्छिणाऱ्या प्रवाशांनी प्रवासाच्या तीन दिवस आधी कोव्हिड १९ची चाचणी करून घ्यावी व त्यात निगेटिव्ह असणाऱ्यांनी अमेरिकेत दाखल झाल्यानंतर त्याविषयीचे प्रमाणपत्र सादर करावे,’ असे रेडफिल्ड यांनी एका निवेदनात म्हटले आहे. ‘एखादा प्रवासी करोनातून बरा झाला असल्यास त्याने त्यासंबंधी कागदपत्रे देणे आवश्यक आहे. करोना निगेटिव्ह वा करोनातून बरे झाल्याचे प्रमाणपत्र न बाळगणाऱ्या प्रवाशांना विमानात प्रवेश देऊ नये,’ अशा सूचना विमान कंपन्यांना करण्यात आल्या आहेत.

प्रवासी करोनामुक्त असतील तर विमानप्रवासात, विमानतळांवर व ते जात असणाऱ्या ठिकाणी करोनाचा संसर्ग होण्याची शक्यता अत्यल्प ठरेल, असे रेडफिल्ड म्हणाले. अमेरिकेत आतापर्यंत २.२ कोटी नागरिकांना करोनाची लागण झाली असून, पावणेचार लाख नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

वाचा:

अमेरिकेत करोनाबाधितांच्या संख्या वाढत असताना दुसरीकडे करोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या वाढत आहे. अमेरिकेत मृतांच्या संख्येत वेगाने वाढ होत असून मंगळवारी एकाच दिवसात चार हजारजणांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली.

वाचा: वाचा:

अमेरिकेत करोनाबाधितांच्या संख्या वाढत असताना दुसरीकडे करोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या वाढत आहे. अमेरिकेत मृतांच्या संख्येत वेगाने वाढ होत असून मंगळवारी एकाच दिवसात चार हजारजणांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. करोनाच्या वाढत्या संसर्गाला अटकाव करण्यासाठी अमेरिकेत लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत ९ दशलक्षजणांना करोना लशीचा पहिला डोस देण्यात आला असून २७ दशलक्ष करोना लशीचे डोस वितरीत करण्यात आले असल्याचे ‘सीएनएन’ने म्हटले आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here