मुंबई : सार्वजनिक क्षेत्रातील युनियन बँक ऑफ इंडियाने मार्जिनल कॉस्ट ऑफ फंडवर आधारित असलेल्या कर्जदरात (एमसीएलआर) ०.१५ टक्क्यांची कपात केली आहे. यामुळे विविध मुदतीचा कर्ज दर कमी झाला आहे.

बँकेने ओव्हरनाईट आणि एक महिन्याच्या एमसीएलआरला अनुक्रमे १५ आणि ५ बेसिस पॉइंट्सने कमी केला आहे. यामुळे आता एक दिवसाचा एमसीएलआर ६.७५ टक्क्यांच्या जागी ६.६० टक्के होणार आहे. तोच एका महीन्याचा कर्जदर ६.७० टक्क्यांपर्यंत जाईल, जो आधी ६.७५ टक्के इतका होता. ३ आणि ६ महिने तसेच १ वर्षाचा एमसीएलआर अनुक्रमे ६.९० टक्के, ७.०५ टक्के व ७.२० टक्के राहील. एमसीएलआरचा नवा दर ११ जानेवारी २०२१ पासून लागू करण्यात आल्याची माहिती बँकेने दिली आहे.

सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या एसबीआयने देखील व्याजदर आणि प्रक्रिया शुल्कात कपात केली आहे. ३० लाखांपर्यंतच्या कर्जावर ६.८ टक्के व्याजदर आहे. ३० लाखांवरील कर्जावर ६.९५ टक्के व्याज लागू केले जाईल. ज्या ग्राहकांचे सिबिल स्कोअर चांगला असेल तर त्या ग्राहकांना व्याजदर सवलत आणि प्रक्रिया शुल्कात सवलत दिली जाईल, असे एसबीआयने म्हटलं आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here