लंडन: करोनाच्या संसर्गावर मात केलेल्या रुग्ण फैलावू शकतात असा दावा ब्रिटीश संशोधकांनी केला आहे. एका संशोधनातून बाब समोर आली आहे. करोनातून बरे झाल्यानंतर किमान पाच महिन्यांसाठी रोगप्रतिकारक क्षमता वाढते. या दरम्यान संबंधित रुग्णाला करोनाची बाधा होऊ शकत नाही. मात्र, इतरांना करोनाचा संसर्ग होऊ शकतो असे संशोधकांनी म्हटले आहे.

पाच महिन्यांसाठी रोगप्रतिकारक क्षमता
पब्लिक हेल्थ इंग्लंडच्या विश्लेषणानुसार, संसर्गानंतर स्वाभाविकपणे विकसित होणारी अॅण्टीबॉडी इतरांच्या तुलनेत ८३ टक्के अधिक सुरक्षा देते. संशोधनानुसार पहिल्यांदा संसर्गबाधित झाल्यानंतर कमीत कमी पाच महिन्यांपर्यंत प्रतिकारक क्षमता असते.

करोनातून बरे झालेलेही फैलावू शकतात

संशोधकांनी इशारा दिला की, शरीरात अॅण्टीबॉडीजची रोगप्रतिकारक शक्ती विकसित झाली आहे अशा व्यक्तीदेखील नाक अथवा गळ्याद्वारे विषाणूचे वाहक असू शकतात. या व्यक्तिंमुळे इतरांनाही करोनाची बाधा होण्याचा धोका आहे. वरिष्ठ वैद्यकीय सल्लागार प्रा. सुसैन हॉपकिन्स यांनी सांगितले की, या संशोधनामुळे आपल्याला करोनाविरोधातील अॅण्टीबॉडीबाबत आतापर्यंत स्पष्ट चित्र समोर आले आहे.

वाचा:

वाचा:

ज्यांना संसर्ग झाला, त्या व्यक्तिंमध्ये अॅण्टीबॉडीज तयार झाल्या आहेत. त्यातील बहुतांशजणांना पुन्हा एकदा संसर्गापासून संरक्षण मिळते. मात्र, हे संरक्षण किती काळ असेल याबाबत काहीही माहिती नसते. लोकांनी करोनावर मात केली तरी ते करोनाचा संसर्ग फैलावू शकतात असेही त्यांनी म्हटले.

वाचा:
दरम्यान, ब्रिटनमध्ये
संसर्गाचे थैमान थांबवण्याची चिन्हे दिसत नाहीत. बुधवारी करोनाच्या संसर्गाने १५६४ जणांचा मृ्त्यू झाला आहे. करोनाची लागण झाल्यानंतर २८ दिवसांतच त्यांचा मृ्त्यू झाला आहे. करोना महासाथीच्या आजारामुळे आतापर्यंत ८४ हजार ७६७ जणांना प्राण गमवावे लागले आहे. वेगाने फैलावणाऱ्या करोनाच्या संसर्गाला अटकाव करण्यासाठी देशभरात लॉकडाउनची लागू करण्यात आला आहे. करोनाच्या संसर्गाला रोखण्यासाठी विविध पातळींवर प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. ब्रिटनमध्ये सध्या लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. फायजर-बायोएनटेक आणि ऑक्सफर्ड-एस्ट्राजेनेकाची लस देण्यात येत आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here