मुंबईः राज्यात आज ७० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून दिवसभरात ३ हजार ५७९ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे तर ३ हजार ३०९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. दरम्यान, करोनाचे रुग्ण कमी होत असले तरी राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या मात्र, ५२ हजार २९१ इतकी झाली आहे.

राज्यात रुग्णवाढीला गेल्या काही दिवसांपासून मोठा ब्रेक लागला आहे. तुलनेने रुग्ण बरे होण्याचे प्रमाण मात्र सातत्याने कमी जास्त होत आहे. बुधवारच्या तुलनेत रुग्ण बरे होण्याचा आकडा स्थिर आहे. त्यामुळं रिकव्हरी रेट किंचित वाढला आहे. राज्यात आज ७० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून आतापर्यंत एकूण मृतांचा आकडा ५० हजार २९१ इतका झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.५४% एवढा आहे.

राज्यात आज ३,५७९ नवीन रुग्णांचे निदान झाले असून त्यामुळं राज्यातील एकूण रुग्णांची संख्या १९ लाख ८१ हजार ६२३ इतकी झाली आहे. तर, आज राज्यात ३ हजार ३०९ रुग्णांनी करोनाची लढाई यशस्वीरित्या जिंकली आहे. राज्यात आजपर्यंत एकूण १८,७७,५८८ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळं राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.७५ टक्के इतके झाले आहेत.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,३६,२३,२९८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १९,८१,६२३ (१४.५५ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १,९६,८२९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २,४०३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here