नवी दिल्ली: नवीन कृषी कायद्यांवरून ( ) सरकार आणि आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटनांमध्ये ( ) कुठलाही तोडगा निघालेला नाही. शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा आज ५० वा दिवस आहे. दरम्यान, किसान युनियनने २६ जानेवारीच्या ट्रॅक्टर रॅलीबाबत ( tractor march ) एक महत्त्वाची घोषणा केली आहे. आंदोलन करणारे शेतकरी २६ जानेवारीला ( ) लाल किल्ल्यावर ट्रॅक्टर रॅली काढणार नाहीत. आता शेतकरी दिल्ली सीमेवरच काढतील. भारतीय किसान युनियनचे (राजेवाल ग्रुप) नेते बलबीरसिंग राजेवाल यांनी शेतकऱ्यांना लिहिलेल्या पत्रात हे स्पष्ट केलं आहे. ट्रॅक्टर मार्च फक्त हरयाणा-नवी दिल्ली सीमेवर असेल. लाल किल्ल्यावर ट्रॅक्टर मार्च काढण्याचा आपला कोणताही हेतू नाही. पुटीरतावादी तत्व लाल किल्ल्याबाहेर ट्रॅक्टर मार्च काढण्याच्या प्रयत्नात आहेत. यामुळे शेतकऱ्यांनी त्यांच्यापासून दूर रहावं, असं आवाहन बलबीर सिंह राजेवाला यांनी केलं आहे.

५० ते ६० हजार ट्रॅक्टर दिल्लीच्या सीमांवर दाखल

ट्रॅक्टर परेडसाठी दिल्लीच्या वेगवेगळ्या सीमांवर ५०-६० ट्रॅक्टर दाखल झाले आहेत. ट्रॅक्टर मार्च शांततेत काढला जाईल, असं शेतकरी म्हणाले. सर्वोच्च न्यायालयाच्या समितीच्या निर्णयावरही शेतकरी संघटना समाधानी नाहीत. शेतकऱ्यांनी बुधवारी लोहरीनिमित्त कृषी कायद्यांच्या प्रति जाळल्या आणि आंदोलन अधिक तीव्र करण्याचं आवाहन केलं.

गुराढोरांसह दिल्लीत घुसणार

मकदुली येथील टोल नाक्यावर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. शेळ्या, मेंढ्या आणि गायी, म्हशींसह २६ जानेवारीला दिल्लीत घुसू. प्रजासत्ताक दिनाला ट्रॅक्टर परेडही करणार असल्याचं येथील शेतकऱ्यांनी सांगितलं. २६ जानेवारीच्या दिल्ली कूचसाठी गावोगावी जनसंपर्क मोहीम राबवली जात आहे, असं अंबावटाचे प्रदेशाध्यक्ष अनिल नंदल म्हणाले.

‘जगात चुकीचा संदेश जाईल’

प्रजासत्ताक दिन हा आपला राष्ट्रीय सोहळा आहे. त्यात कुठल्याही प्रकारचा व्यत्यय येत असेल तर संपूर्ण जगात चुकीचा संदेश जाईल, असं कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी म्हणाले. यामुळे शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी हे समजून घ्यावं आणि आपला निर्णय मागे घ्यावा, असं आवाहन त्यांनी आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटनांना केलं आहे.

दिल्ली पोलिसांचे प्रतिज्ञापत्र

प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर-ट्रॉली / वाहन मोर्च किंवा कोणत्याही प्रकारच्या आंदोलनावर बंदी घालावी, यासाठी केंद्राने दिल्ली पोलिसांमार्फत सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केलं आहे. “सोहळ्यात कोणचाही अडथळा केवळ कायदा-सुव्यवस्था आणि जनहिताच्या विरोधातच नाही तर देशासाठीही लाजीरवाणीबाब असेल, असं प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे.

शेतकर्‍यांच्या भावना समजून घेण्याची गरज: शिवसेना

परिस्थिती अधिक चिघळू नये असं सरकारला वाटत असेल तर त्यांनी शेतकऱ्यांच्या भावना समजून घ्याव्यात. आतापर्यंत या आंदोलनात ६० ते ६५ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. देशात स्वातंत्र्यानंतर आतापर्यंत असं शिस्तबद्ध आंदोलन बघण्यात आलं नाही, असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here