नाशिकः भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात लागलेल्या आगीत १० बालकांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आता नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातील प्रसुती वॉर्डमध्ये नवजात बाळांच्या भोवती झुरळांचा संचार असल्याचं समोर आलं आहे.

भंडारा जिल्हा रुग्णालयातील घटनेमुळं अवघा महाराष्ट्राला हादरा बसला होता. त्यानंतर पुन्हा एका रुग्णालयात नवजात बालकांचं आरोग्याशी खेळ सुरु असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नवजात बालकांच्या कानात आणि नाकात झुरळ गेल्यास बालक कर्णबधीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

बेडपासून फरशीपर्यंत सगळीकडे धुरळं सापडत असल्याचं समोर आलं आहे. बेडशेजारी असलेल्या कपाटातही मोठ्या प्रमाणात झुरळांचा संचार आहे. प्रसुती विभागातील झुरळांच्या संचारामुळं व रुग्णालयातील अस्वच्छतेमुळं रुग्णांच्या आरोग्याची हेळसांड होत आहे.

नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातील प्रसुती वॉर्डात प्रचंड झुरळं असल्याचं समोर आलंय. या वॉर्डात नवजात बालकं असून कपाट, भितींवर, कॉटवर सगळीकडेच झुरळांचा संचार आहे. प्रशासनाच्या माध्यमातून पेस्ट कंट्रोलच्या कामाचा ठेका जातो तरी इतके झुरळे कसे, असा प्रश्न निर्माण होतो, या विषयाकडे प्रशासनाचं पूर्णपणे दुर्लक्ष आहे, असं भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी म्हटलं आहे.

नवजात बालकांचं स्वागत आज झुरळांपासून होतंय, हे दुर्दैवी आहे. नाशिकच्या जिल्हा रुग्णालयाची चौकशी करुन तातडीने कारवाई व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. सरकारने याकडे संवेदनशीलपणे लक्ष देण्याची आवश्यकता आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here