ब्रिस्बेन, : तिसरा कसोटी सामना वाचवण्यात आर. अश्विनने मोलाचा वाटा उचलला. पण आता चौथ्या कसोटी सामन्यात अश्विन भारतीय संघासाठी हुकमी एक्का ठरू शकतो, असे म्हटले जात आहे. या सामन्यात अश्विन हुकमी एक्का कसा ठरू शकतो, पाहा…

ब्रिस्बेन कसोटीसाठी खेळपट्टीही सर्वात महत्वाची ठरणार आहे. या खेळपट्टीवर चेंडूला जास्त उसळी मिळेल, असे म्हटले जात आहे. त्याचबरोबर फिरकीपटूंना या खेळपट्टीवर चांगली मदत मिळेल, असेही पाहायला मिळत आहे. त्यामुळे या सामन्यात फिरकीपटूंची भूमिकाही महत्वाची ठरणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघातील फिरकीपटू नॅथन लायनने हे मैदान चांगलेच गाजवलेले आहे. नॅथनने या मैदानात एकट्याने ३५ विकेट्स मिळवले आहेत. त्यामुळे अश्विनची गोलंदाजी या सामन्यात निर्णायक ठरू शकते. पण अश्विन हा सामना खेळण्यासाठू पूर्णपणे फिट आहे की नाही, हे भारतीय संघाला नक्कीच पाहावे लागेल.

या सामन्यात भारताचा फिरकीपटू आर. अश्विन हा ऑस्ट्रेलियाविरुद्ध विकेट्सचे शतक पूर्ण करू शकतो. आतापर्यंत अश्विनने १८ कसोटी सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध ८९ विकेट्स मिळवले आहेत. त्यामुळे आता अश्विनने जर या सामन्यात ११ बळी मिळवले तर त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्ध १०० विकेट्स पूर्ण करण्याची संधी असेल. त्यामुळे अश्विनने जर या सामन्यात हा विक्रम नोंदवला तर नक्कीच भारतीय संघ विजय मिळवू शकतो. त्यामुळे अश्विनचे चौथ्या कसोटी सामन्यात खेळणे हे भारतीय संघासाठी महत्वाचे आहे.

पाचव्या दिवशी जेव्हा अश्विन सामन्याची तयारी करत होता तेव्हा त्याच्या कंबरेमध्ये उसण भरली होती, त्याला चालताही येत नव्हते. कारण अश्विनची दुखापत ही गंभीर वाटत होती. त्यामुळे अश्विन मैदानात कसा खेळेल, याची चिंता सर्वांना होती. अश्विनला यावेळी मैदानातही काही दुखापती झाल्या. अश्विनच्या हाताला, खांद्याला आणि बरगड्यांना चेंडू लागले होते आणि फिजिओ मैदानात जाऊन त्याच्यावर उपचार करत असल्याचे पाहायला मिळत होते. पण अश्विन मैदानात उतरला आणि त्याने भारताला सामना वाचवून देण्यात यश मिळवून दिले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here