ब्रिस्बेन, : चौथा कसोटी सामना आता काही तासांवर येऊन ठेपला आहे. पण या सामन्यात पाच विक्रम होऊ शकतात. एकाच कसोटी कोणते पाच विक्रम होऊ शकतात, पाहा…

अजिंक्य आणि रोहित पूर्ण करू शकता हजार धावा
भारताचा कर्णधार अजिंक्य रहाणे आणि रोहित शर्मा यांना या सामन्यात विक्रम रचण्याची संधी आहे. अजिंक्य ऑस्ट्रेलियाविरुद्ध एक हजार धावा या सामन्यात पूर्ण करू शकतो. त्याचबरोबर रोहितला परदेशातील कसोटी सामन्यांमध्ये एक हजार धावा पूर्ण करण्याची संधी असून तो फक्त १०६ धावांनी पिछाडीवर आहे.

चेतेश्वर पुजारा दोन हजार धावांच्या जवळ
भारताचा भरवश्याचा फलंदाज चेतेश्वर पुजारा बोर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये दोन हजार धावा पूर्ण करू शकतो. पुजारा दोन हजार धावा करण्यापासून १८८ धावा मागे आहे. आतापर्यंत ३५ डावांमध्ये पुजाराच्या नावावर १८१२ धावा आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाच्या धर्तीवर एक हजार धावा पूर्ण करण्यासाठी पुजाराला ८८ धावांची गरज आहे.

रहाणे ठरू शकतो अजिंक्य
कर्णधार अजिंक्य रहाणेकडून या सामन्यात मोठ्या अपेक्षा असतील. कारण आतापर्यंत ऑस्ट्रेलियाविरुद्ध अजिंक्यने ११ कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये तीन सामन्यांमध्ये अजिंक्यने आतापर्यंत नेतृत्व केले असून त्याला एकदाही पराभव पत्करावा लागलेला नाही. त्यामुळे चौथ्या सामन्यात जर रहाणेच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने विजय मिळवला तर तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध अजिंक्य राहू शकतो. त्याचबरोबर परदेशी खेळपट्ट्यांवर तीन हजार धावा पूर्ण करण्यासाठी त्याला ८८ धावांची गरज आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध अश्विनचे विकेट्सचे शतक
या सामन्यात भारताचा फिरकीपटू आर. अश्विन हा ऑस्ट्रेलियाविरुद्ध विकेट्सचे शतक पूर्ण करू शकतो. आतापर्यंत अश्विनने १८ कसोटी सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध ८९ विकेट्स मिळवले आहेत. त्यामुळे आता अश्विनने जर या सामन्यात ११ बळी मिळवले तर त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्ध १०० विकेट्स पूर्ण करण्याची संधी असेल.

नॅथन लायनची शंभरावी कसोटी आणि ४०० बळींपासून ४ विकेट्स दूर
ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू ब्रिस्बेनमध्ये आपला शंभरावा कसोटी सामना खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. ऑस्ट्रेलियाकडून शंभरावा कसोटी सामना खेळणारा तो १३वा खेळाडू ठरणार आहे. त्याचबरोबर कसोटी क्रिकेटमध्ये ४०० बळी मिळवण्यासाठी तो फक्त चार विकेट्स लांब आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here