ब्रिस्बेन, : चौथ्या कसोटी सामन्यापूर्वी भारतीय संघापुढे बऱ्याच अडचणी आहेत. पण तरीही चौथ्या कसोटी सामन्यासाठी भारत फेव्हरेट असल्याचे मत ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूने व्यक्त केले आहे.

ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट ली यावेळी म्हणाला की, ” चौथ्या कसोटी सामना भारतीय संघ जिंकू शकतो, असे मला वाटते. त्यासाठी कोणत्याही चमत्काराची गरज आहे, असे मला वाटत नाही. कारण चौथ्या कसोटीपूर्वी काही गोष्टींमध्ये बदल झाला आहे. त्यामुळे चौथ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघच माझ्यासाठी फेव्हरेट असेल.”

ब्रेट ली पुढे म्हणाला की, ” भारतीय संघाला सध्याच्या घडीला दुखापतींनी ग्रासले आहे. त्यांच्याकडे पर्याय फार कमी उपलब्ध आहेत. पण ऑस्ट्रेलियाकडे पाहिले तर त्यांच्याकडे चांगले फलंदाज नाहीत. त्यामध्येच ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर विल पुकोव्हस्की या सामन्यात खेळेल की नाही, याबाबत संदिग्धता आहे. जर ऑस्ट्रेलियाच्या संघाची सलामी चांगली झाली नाही तर भारतीय संघ या सामन्यात आघाडीवर जाऊ शकतो. त्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या डावाची सुरुवात नेमकी कशी होते, हे पाहणे महत्वाचे आहे. पण तरीही माझ्यासाठी चौथ्या कसोटीत भारत फेव्हरेट असेल.”

आतापर्यंत ब्रिस्बेनच्या मैदानात भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये सहा कसोटी सामने झाले आहेत. या सहापैकी पाच कसोटी सामन्यांमध्ये भारताला पराभव पत्करावा लागला आहे, तर एक कसोटी सामना अनिर्णीत राहिला आहे. त्यामुळे भारतीय संघाने जर हा कसोटी सामना जिंकला तर त्यांच्यासाठी हा ऐतिहासिक विजय ठरू शकतो.

ब्रिस्बेन हे मैदान ऑस्ट्रेलियासाठी आतापर्यंत सर्वात लकी ठरलेले आहे. कारण गेल्या जवळपास ३४ वर्षांमध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ एकही सामना या मैदानात हरलेला नाही. यापूर्वी १९८८ साली ऑस्ट्रेलियाच्या संघाला वेस्ट इंडिजने या मैदानात पराभूत केले होते. पण त्यानंतर गेल्या ३१ सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाच्या संघाने या मैदानात एकही सामना गमावलेला नाही. त्यामुळे है मैदान ऑस्ट्रेलियासाठी लकी समजले जाते. पण भारतीय संघाने गेल्या दोन सामन्यांमध्ये वरचष्मा राखाल आहे. त्यामुळे भारतीय संघाकडे इतिहास रचण्याची ही सुवर्णसंधी आहे, असेदेखील म्हटले जात आहे. कारण भारताने अजिंक्याच्या नेतृत्वाखाली दुसरा सामना जिंकला होता. त्यानंतर तिसरा कसोटी सामना वाचवण्यात भारतीय संघाला यश आले होते. त्यामुळे भारतीय संघ ब्रिस्बेन कसोटीत कोणती कमाल दाखवतो, याकडे सर्वांचेच लक्ष असेल.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here