म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादः ‘वंचित बहुजन आघाडीला दलित-वंचितांच्या हक्काची ( ) जाणीव असती तर त्यांनी रिपब्लिकन चळवळीला सोबत घेतले असते. त्यामुळे रिपब्लिकन चळवळीला अस्तित्वहीन म्हणण्याचा त्यांना अधिकार ( ) नाही. वंचित बहुजन आघाडी ही संधीसाधू लोकांची आघाडी आहे. राजकीय स्वार्थासाठी उभारलेल्या या ठिसूळ संघटनेतील लोक आले तसे बाहेर पडले’, अशी टीका पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष प्रा. ( ) यांनी केली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्तार दिनी अभिवादन करण्यासाठी पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष व माजी आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे गुरुवारी शहरात आले होते. सुभेदारी विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत प्रा. कवाडे यांनी राजकीय घडामोडींवर भाष्य केले. ‘देशभरात दलित अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. हाथरस, उन्नाव, कठुआ घटनेत भाजप समर्थकांनी आरोपींची पाठराखण केली. संविधान धोक्यात आल्याची ही चाहूल आहे. दलित चळवळ विखुरल्यामुळे नेत्यांचा धाक असला तरी सामूहिक शक्ती क्षीण झाली आहे. म्हणून ‘पीपल्स रिपब्लिकन पक्ष’ येत्या २६ जानेवारीपासून देशात ‘आत्मनिर्भर अत्याचार प्रतिकार अभियान’ राबवणार आहे. भाजपशी बांधिल लोक कृषी कायद्यांचे समर्थन करीत आहेत. शेतकऱ्यांचे आंदोलन संविधानविरोधी आहे असे सांगत आहेत. भाजपच्या आघाडीत असलेले रामदास आठवले वारंवार संविधानाचा अपमान करीत आहेत. कृषी कायदा जनमत न घेता मंजूर करण्यात आला. कायदाच घटनाबाह्य असताना शेतकऱ्यांच्या आंदोलनाला घटनाविरोधी का ठरवता, असा सवाल प्रा. कवाडे यांनी केला. ‘वीस वर्षांपूर्वी काँग्रेसशी आघाडी केल्यामुळे लोकसभा निवडणुकीत आंबेडकरी पक्षांनी चार जागा जिंकल्या होत्या. ही ऐक्याची ताकद गमावली आहे. वंचित बहुजन आघाडीने रिपब्लिकन चळवळीला सोबत घेतले नाही. ही संधीसाधू लोकांची आघाडी आहे. राजकीय स्वार्थासाठी उभारलेल्या या ठिसूळ संघटनेतून लोक बाहेर पडले आहेत. गोपीचंद पडळकर, प्रा. यशपाल भिंगे, लक्ष्मण माने, हरिभाऊ भदे अशी मोठी रांग आहे. आघाडी स्थापन करुन त्या बदल्यात बाळासाहेब आंबेडकरांना काय मिळतं ते ओवेसीला विचारा, अशी खोचक टीका प्रा. कवाडे यांनी केली.

दरम्यान, भारतीय बौद्ध महासभेने धर्म आणि जातीच्या रकान्यात जात लिहिण्याचे आवाहन केले आहे. हा प्रकार बाबासाहेबांच्या जातीअंताच्या चळवळीला मारक आहे. ही बाबासाहेबांचीच बौद्ध महासभा की आरएसएसच्या इशाऱ्यावर चालणारी महासभा आहे, असा सवाल कवाडे यांनी केला. भीमराव आंबेडकर यांनी या माध्यमातून धम्मक्रांतीचा आणि जातीअंत चळवळीचा पराभव करू नये, असे कवाडे म्हणाले. औरंगाबाद महानगरपालिकेच्या निवडणुकीत पक्ष स्वबळावर २१ लढवणार आहे. शेतकरी केंद्र सरकारच्या धोरणामुळे अडचणीत आहे. कॉर्पोरेट कंपन्यांसाठी मोदी सरकारने शेतकऱ्यांना वेठीस धरल्याचे कवाडे म्हणाले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here