बेंगळुरूः केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह ( ) आज कर्नाटक दौर्‍यावर आहेत. माजी सैनिक दिनानिमित्त त्यांनी संबोधित केलं. आपल्या सैन्य दलाच्या जवानांनी जे शौर्य आणि पराक्रम दाखवले ते अभूतपूर्व आहे. भारतावर कुठल्याही प्रकारचा धोका येऊ देणार नाही. इंग्रजीत एक म्हण आहे. ‘Once a soldier, Always a Soldier’. ‘माजी सैनिक दिन’ हा आपल्याला आणि आपल्या कुटुंबाने देशाच्या सेवेदरम्यान दिलेल्या त्या बलिदानाची आठवण करून देतो, असं राजनाथ सिंह म्हणाले. आता सरकारने देशातील संरक्षण क्षेत्राला चालना देण्यासाठी एचएएलला ८३ तेजस विमानांच्या ( ) उत्पादनचे आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे देशात जवळपास ५० हजार नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असं राजनाथ सिंह म्हणाले.

लडाखमध्ये गलवान खोऱ्यात गेल्या वर्षी झालेल्या भारत आणि चीनमधील संघर्षात आपल्या जवानांनी अतुलनीय शौर्य आणि संयमाचं प्रदर्शन केलं. चीनविरूद्ध भारतीय जवानांनी केलेल्या कारवाईने प्रत्येक भारतीयला अभिमान आहे, असं राजनाथ सिंह म्हणाले.

‘बालाकोट पेक्षाही मोठा हल्ला करण्याची क्षमता’

हे चीन आणि पाकिस्तान यांच्या संयुक्त विद्यमाने तयार केलेल्या जेएफ -17 विमाना पेक्षा चांगले आणि उच्च तंत्रज्ञानाचे आहे, असं हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल आरकेएस भदोरिया म्हणाले. ‘बालाकोटवरील हवाई हल्ल्यापेक्षाही अधिक ताकदीने हल्ला करण्याची क्षमता तेजसमध्ये आहे. कोणत्याही शस्त्रांची बरोबरी करण्यास तेजस सक्षम आहे’, असं भदोरिया म्हणाले.

आता असतील ६ स्क्वॉड्रन

हलके लढाऊ विमान ‘तेजस’च्या येण्याने हवाई दलाची ४ स्क्वॉड्रन वाढतील. सध्या २ स्क्वॉड्रन आहेत आणि आणखी ८३ नवीन तेजसची भर पडल्यानंतर त्यांची संख्या ६ स्क्वॉड्रनवर जाईल. या विमानांची तैनाती अग्रभागी असेल, असं ते म्हणाले.

येत्या ८ ते ९ वर्षांत संपूर्ण यंत्रणा बदलेल

८३ विमानं खूप आहेत. जेव्हा अशी ऑर्डर दिले जाते तेव्हा पुढील ८ ते ९ वर्षांत संपूर्ण यंत्रणा बदलली जाईल. सैनिकी विमान वाहतुकीसाठी हे एक मोठे पाऊल आहे. लढाऊ विमानांच्या निर्मितीतही हे एक मोठं पाऊल आहे. देशी संरक्षण उत्पादन उद्योगदेखील यामुळे बळकट होईल, असा विश्वास हवाई दल प्रमुख भदोरिया यांनी व्यक्त केला.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here