मुंबईः सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे ( ) यांच्यावरील बलात्काराचे आरोप आणि त्यांनी विवाहबाह्य संबंधाची दिलेली कबुली राज्यातलं राजकारण तापलं आहे. या प्रकरणाची गंभीर दखल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष ( ) यांनी घेतली. या पार्श्वभूमीवर रात्री उशिरा पक्षाचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी कोअर कमिटीची बैठक ( ) झाली. जवळपास १ तासभर ही बैठक चालली. रात्री साडे अकराच्या सुमारास ही बैठक संपली.

प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात ही बैठक झाली. धनंजय मुंडे प्रकरणामुळे कोअर कमिटीची ही बैठक महत्त्वाची मानली गेली. रात्री दहावाजेच्या सुमारास ही बैठक सुरू झाली. ही बैठक तासभर चालली आणि आकरा वाजेच्या सुमारास संपल्याचं सांगण्यात येतंय.

धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांची माहिती शरद पवार यांनी मुंबईचे सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्याकडून घेतल्याचं सांगण्यात येतंय. विश्वास नांगरे पाटील हे शरद पवारांच्या सिल्वर ओक बंगल्यावर संध्याकळच्या सुमारास दाखल झाले होते. यावेळी शरद पवार यांनी नांगरे पाटील यांच्याशी चर्चा केल्याचं बोललं जातंय.

संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतल्यानंतर शरद पवार यांनी पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक घेतली. प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत काय चर्चा झाली, हे अद्याप समोर आलेलं नाही. पण धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद राहणार की जाणार? की पक्ष त्यांना अभय देणार? याचं चित्र लवकरच स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

बलात्काराच्या आरोपांनंतर विरोधी पक्षांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुंडे यांनी बुधवारी सिल्वर ओकवर जाऊन पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. या भेटीत मुंडे यांनी शरद पवारांसमोर आपली बाजू सविस्तरपणे मांडली. त्यापूर्वी मुंडे यांनी मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि नंतर छगन भुजबळांचीही भेट घेतली होती.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here