कोल्हापूर / पुणेः आजाराला ( ) प्रतिबंध करण्यासाठी कोल्हापूर महापालिकेने ‘रॅपिड अॅक्शन फोर्स’ तयार केला आहे. या फोर्सकडून शहरातील कत्तलखाने, मटण व चिकन विक्री मार्केट्स व दुकानांमध्ये स्वच्छता व निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे. तसेच परराज्यातून येणारे पक्ष्यांची आयात रोखण्याचे ठरविले आहे.

राज्यात ठिकठिकाणी पसरत असलेल्या बर्ड फ्लू आजाराचा धोका संभवत आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी कोल्हापूर महापालिकेने शहरातील मटण-चिकन विक्रेते, दुकानदार, पुरवठादार, व्यापाऱ्यांची कार्यशाळा घेतली. महापालिकेचे पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय पाटील, पशु संवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. सॅम लुद्रीक यांनी मार्गदर्शन केले.

महापालिकेकडून सर्व मटण व चिकन दुकानाकडील मांसमिश्रीत कचरा उठावासाठी वाहने उपलब्ध असणार आहेत. शहरात स्थलांतरित पक्षी येणाऱ्या ठिकाणांवर लक्ष ठेवणे, मृत पक्षी आढळलेस त्याला स्पर्श न करता महापालिका अथवा पशु संवर्धन विभागाच्या कार्यालयास कळवावे, असे आवाहन केले आहे.

‘इन्फ्लूएंझा’सदृश रुग्णांच्या सर्वेक्षणाचे आदेश

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये ‘बर्ड फ्लू’चा संसर्ग वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या आरोग्य खात्याने खबरदारीचा उपाय म्हणून ‘इन्फ्लूएंझा’सदृश रुग्णांच्या ( ) सर्वेक्षणाचे आदेश महापालिकांच्या आरोग्यप्रमुखांना दिले आहेत. सर्वेक्षणाला सुरुवात झाली असून, संशयितांचे नमुने ‘राष्ट्रीय विषाणू संस्थे’कडे (एनआयव्ही) पाठविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

केरळ, मध्य प्रदेश, गुजरात, हिमाचल प्रदेश, राजस्थान आणि हरियाणामधील कोंबड्या, कावळे आणि स्थलांतरित पक्ष्यांना ‘बर्ड फ्लू’ची लागण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यात उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. ‘बर्ड फ्लू’च्या पार्श्वभूमीवर महापालिका तसेच जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ‘इन्फ्लूएंझा’ सदृश रुग्णांचे सर्वेक्षण प्रभावीपणे करण्यात यावे. विशेषतः पोल्ट्री फार्म, कत्तलखाने येथे कार्यरत कर्मचारी, पशुसंवर्धन क्षेत्रातील मनुष्यबळ या जोखमीच्या गटांतील ‘इन्फ्लूएंझा’सदृश रुग्णांचे सर्वेक्षण प्रभावीपणे करण्यात यावे, संशयितांचे नमुने ‘एनआयव्ही’कडे पाठविण्याचे आदेश आरोग्य खात्याने दिले आहेत. सर्व जिल्ह्यांचे आरोग्य अधिकारी, महापालिकांचे वैद्यकीय अधिकारी आणि सर्व जिल्हा शल्यचिकित्सकांनी अंमलबजावणी करावी, अशा सूचनाही करण्यात आल्या आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here