वाचा-
नाणेफक झाल्यानंतर भारताचा कर्णधार अजिंक्य रहाणे याने भारतीय संघात चार बदल झाल्याचे सांगितले. बुमराह, अश्विन, जडेजा आणि विहारी यांच्या जागी संघात शार्दुल ठाकूर, टी नटराजन, वॉशिंग्टन सुंदर आणि मयांक अग्रवाल यांचा समावेश करण्यात आला आहे. टी नटराजन आणि वॉशिंग्टन सुंदर हे दोघे भारताकडून कसोटीत पदार्पण करत आहेत.
चौथ्या कसोटीला सुरुवात होण्याआधी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. दुखापतीमुळे भारताचे अनुभवी गोलंदाज संघाबाहेर झाले असून उपलब्ध असलेल्या खेळाडूंतून चांगला संघ निवडण्याची वेळ भारतीय संघ व्यवस्थापनावर आली आहे.
भारतीय संघातील गोलंदाजीकडे पाहिल्यास मोहम्मद सिराज आणि नवदीप सैनी यांच्याकडे प्रत्येकी दोन आणि एका कसोटी सामन्याचा अनुभव आहे. तर शार्दुल ठाकूरकडे फक्त ११ षटकांचा अनुभव तर टी नटराजन कसोटीत पदार्पण करतोय.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times