म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
सेलिब्रिटींचा हेअर स्टायलिस्ट याला अंमली पदार्थ प्रकरणात विशेष एनडीपीएस न्यायालयाने नुकताच जामीन मंजूर केला. तो नऊ डिसेंबरपासून अटकेत होता. ( in Drugs Case)

”च्या अधिकाऱ्यांनी सूरजला अन्य एका आरोपीसह अटक केली होती. दोघांकडे प्रतिबंधित अंमली पदार्थ सापडल्याचा आरोप आहे. आपली कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसून या प्रकरणात गोवण्यात आले आहे, असा दावा करून सूरजने जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, या प्रकरणी अद्याप तपास सुरू आहे, असे म्हणत जामीन देण्यास ‘एनसीबी’ने विरोध दर्शवला होता.

‘आरोपीकडून अव्यापारी स्वरूपाच्या प्रमाणात म्हणजे ११ ग्रॅम कोकेन हस्तगत करण्यात आले. केवळ या गुन्ह्याच्या प्रकरणात दहा वर्षांपर्यंतची शिक्षा आहे, हे म्हणणे जामीन नाकारण्यासाठी आधार ठरू शकत नाही. न्यायालयीन कोठडीत असल्याने त्याने जामिनासाठी अर्ज केला होता. आरोपीच्या अटकेच्याच दिवशी त्याच्याविषयीचा बहुतांश तपास पूर्ण झाल्याचे दिसत आहे. तसेच, सुरू असलेल्या तपासासाठी त्याचे तुरुंगात राहणे आवश्यक असल्याचे कारण ‘एनसीबी’ने दाखवलेले नाही. आरोपी फरारी होऊ नये, या दृष्टिने ‘एनसीबी’च्या कार्यालयात वारंवार हजेरी लावण्याची अट घालता येऊ शकते,’ असे निरीक्षण न्यायालयाने निर्णयात नोंदवले. त्यानुसार, सूरजला तीस हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर करताना त्याला आठवड्यातून एक दिवस ‘एनसीबी’ कार्यालयात हजेरी लावण्याची अट न्यायालयाने घातली.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here