मुंबई: सामाजिक न्यायमंत्री यांच्यावर झालेले बलात्काराचे आरोप व ड्रग्ज प्रकरणात नवाब मलिक यांच्या जावयाला झालेल्या अटकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विरोधकांच्या निशाण्यावर आला आहे. त्यातच, मुंडे प्रकरणात माहिती घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष यांनी एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याशी चर्चा केल्याच्या वृत्तामुळं भारतीय जनता पक्ष भडकला आहे.

नवाब मलिक यांना राष्ट्रवादी काँग्रेसनं ‘क्लीन चिट’ दिली असली तरी मुंडे यांच्यावरील आरोप गंभीर असल्यानं राष्ट्रवादी काँग्रेस सावध पावलं टाकत आहे. भाजपच्या नेत्यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केल्यानं दबाव वाढला आहे. शरद पवारांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेत पक्ष तातडीनं निर्णय घेईल, असं काल स्पष्ट केलं होतं. याच पार्श्वभूमीवर मुंबईचे सहपोलीस आयुक्त यांनी काल शरद पवार यांची भेट घेतल्याचं वृत्त झळकलं. मुंडे प्रकरणावर त्यांच्यात चर्चा झाल्याचंही सांगितलं जात होतं.

वाचा:

पवार-नांगरे पाटील यांच्यातील या कथित भेटीवरून भाजपनं शरद पवारांवर टीका केली आहे. ‘पोलीस अधिकाऱ्यांनी शरद पवारांसोबत चर्चा करायला ते राज्याचे गृहमंत्री आहेत की मुख्यमंत्री?,’ असा सवाल भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे. ‘राज्यात कोणतेही अधिकार पद नसलेल्या पवारांशी चर्चा करणाऱ्या या पोलीस अधिकाऱ्यांची हकालपट्टी करावी अशी मागणी कॅबिनेट सचिवांकडे करणार आहे, असंही त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

‘पाठीमागून सूत्रं हलवण्यापेक्षा घरी बसलेल्या मुख्यमंत्र्यांना नारळ देऊन शरद पवारांनी सत्तेची सूत्रे हाती घ्यावीत,’ असा खोचक सल्लाही भातखळकर यांनी दिला आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here