वॉशिंग्टन: आपल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या अखेरच्या दिवसातही डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनला जोरदार झटका दिला आहे. अमेरिकेच्या वाणिज्य विभागाने चीन सरकारची तेल कंपनी CNOOC ला काळ्या यादीत टाकले आहे. इतकंच नव्हे तर या चिनी कंपनीला शेअर बाजारातील स्टॉक सूचकांकातूनन वगळले आहे. आता ही कंपनी कोणत्याही प्रकारे अमेरिकेत व्यापार करू शकत नाही.

अमेरिकेने CNOOC वर केले हे आरोप

अमेरिकेचे वाणिज्य सचिव विल्बर रॉस यांनी बंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर सांगितले की, दक्षिण चीन समुद्रात चीनकडून बेजबाबदार आणि उकसवणारी कृत्ये सुरू आहेत. चीनकडून या भागाचे संपूर्णपणे सैनिकीकरण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. CNOOC ही चिनी सैन्यासाठी काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला. या बंदीमुळे इतर देशांची संवेदनशील बौद्धिक संपदा आणि तंत्रज्ञान मिळवण्यासाठीच्या अभियानाला मोठा झटका लागणार आहे.

वाचा:

याआधीही चिनी कंपन्यांवर बंदी

डिसेंबर महिन्यातच अमेरिकेने चीनची सर्वात मोठी चिप निर्मिती करणारी सेमीकंडक्टर मॅन्यूफॅक्चरिंग इंटरनॅशनल कॉर्पोरेशन आणि ड्रोन निर्मिती करणारी एसझेड डीजेआय टेक्नोलॉजीसह जवळपास १२ चिनी कंपन्यांवर बंदी घातली आहे. या कंपन्या अमेरिकेत व्यापार करू शकत नाही. त्याशिवाय काही कंपन्या आपली संपत्ती आणि बँकेतील रक्कमेचाही वापर करू शकत नाही.

वाचा:

वाचा:

चीनला धक्का देण्याची ट्रम्प यांची इच्छा

मागील महिन्यांमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक चिनी कंपन्यांवर बंदी घातली आहे. यामध्ये चिनी लष्करासोबत व्यापार करणाऱ्या कंपन्यांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. ट्रम्प यांनी मागील वर्षभरात आधी व्यापार करार आणि त्यानंतर करोनाच्या मुद्यावरून सातत्याने लक्ष्य केले. चीनविरोधात आर्थिक आणि राजकीय आघाडी उघडली होती. अमेरिकेच्या वाणिज्य विभागाने सांगितले की, चीन आमच्या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्या सैन्याला अत्याधुनिक करत आहे. चीन अमेरिकाविरोधी पावले उचलत असताना आम्ही शांत बसू शकत नसल्याचे त्यांनी सांगितले.

वाचा:
चिनी कंपन्या राष्ट्रीय धोका

अमेरिकेने बंदी घातलेल्या चिनी कंपन्यांना राष्ट्रीय सुरक्षितेसाठी धोका असल्याचे सांगितले. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मागील काही दिवसात चीनविरोधात मोठे निर्णय घेतले आहेत. या निर्णयांमुळे चीन आणि अमेरिकेत तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. दोन्ही देशांमध्ये आधीपासूनच तणाव सुरू आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here