सामाजिक न्यायमंत्री यांच्यावर झालेले बलात्काराचे आरोप, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या जावयाला ड्रग्ज प्रकरणात झालेल्या अटकेनंतर राज्यात वेगवान घडामोडी घडत आहेत. त्यातच आज संजय राऊत यांनी सहकुटुंब ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानी जाऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. पीएमसी बँकेतील घोटाळ्याप्रकरणी राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांची ईडीकडून चौकशी सुरू आहे. त्या अनुषंगानं ही भेट झाली असावी, अशी चर्चा होती. मात्र, राऊत यांनी मुलीच्या साखरपुड्याचं निमंत्रण देण्यासाठी ही भेट घेतल्याचं समोर येत आहे.
वाचा:
शरद पवारांशी झालेल्या भेटीनंतर राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांना धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या चर्चेबाबत विचारलं गेलं. त्यावेळी त्यांनी थेट मोदींकडे मोर्चा वळवला. ‘आरोप झाले म्हणून राजीनामा द्यायचा तर मोदींना रोज राजीनामा द्यावा लागेल. दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावरून मोदींवर अनेक आरोप होत आहेत, याकडंही त्यांनी लक्ष वेधलं.
‘विरोधी पक्ष आरोप करत असतो. पण प्रत्येक आरोपाचं उत्तर दिलंच पाहिजे असं घटनेत लिहिलेलं नाही. विरोधकांना कितीही आरोप करू द्या. महाविकास आघाडी भक्कम आहे. या आरोपांमुळं सरकारचा एकही खिळा ढिला होणार नाही,’ असा ठाम विश्वास राऊत यांनी व्यक्त केला.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times