वाचा-
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेन याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दोन्ही संघातील चार सामन्यांची मालिका १-१ अशा स्थितीत आहे. त्यामुळेच ब्रिस्बेन येथे सुरू असलेली कसोटी दोन्ही संघांसाठी महत्त्वाची आहे.
ब्रिस्बेन मैदानावर आजपर्यंत कोणत्याही आशिया संघाला कसोटी मालिका जिंकता आली नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या सामन्यातील पहिल्याच ओव्हरमध्ये भारताचा जलद गोलंदाज ( ) ने धमाकेदार सुरूवात करून दिली. सिराज भारताच्या जलद गोलंदाजांचे नेतृत्व करत आहे. त्याने पहिल्या ओव्हरच्या अखेरच्या चेंडूवर ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरची विकेट घेतली. रोहित शर्माने त्याचा शानदार कॅच घेतला.
वाचा-
सिडनी कसोटीनंतर पुन्हा एकदा सिरजाने वॉर्नरची विकेट घेतली. सिराजने पहिल्याच ओव्हरमध्ये विकेट घेऊन कमाल केली. ब्रिस्बेन मैदानावर १९८५ नंतर प्रथमच ऑस्ट्रेलियाला पहिल्या ओव्हरमध्ये विकेट गमवावी लागली. याआधी न्यूझीलंडच्या रिचर्ड हेडली यांनी एड्यू हेलडिजची विकेट घेत अशी कामगिरी केली होती. न्यूझीलंड संघानंतर भारतीय संघ हा पहिला असा संघ ठरला आहे ज्याने ऑस्ट्रेलियाला पहिल्या ओव्हरमध्ये झटका दिला.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times