वाचा:
‘धनंजय मुंडे हे राज्यातील जबाबदार नेते आहेत. कॅबिनेट मंत्री आहेत. त्यांच्यावर जेव्हा एका महिलेने आरोप केले व त्यानंतर त्यांनी जी सोशल मीडियावर माहिती दिली, ती अत्यंत धक्कादायक होती. जनतेमध्ये लोकप्रिय असणारा नेता “एक तरफ घरवाली आणि एक तरफ बाहरवाली” अशा पद्धतीचा संदेश देतो, हे पूर्णपणे चुकीचे आहे. धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळातून तातडीने हकालपट्टी झाली पाहिजे,’ अशी मागणी देसाई यांनी केली आहे. तसेच, रेणू शर्मा या महिलेने जी तक्रार केली, त्या आधारे गुन्हा दाखल व्हावा. संबंधित महिलेने कोणाला ब्लॅकमेल केले असेल तर तिच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करावा,’ अशी मागणीही देसाई यांनी केली आहे.
वाचा:
‘ हे महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे त्यांनीही तातडीने मुंडे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी. महिला सबलीकरण म्हणून राष्ट्रवादी पक्ष काम करतो. त्यामुळे व सुप्रिया सुळे यांनीही धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई करणे गरजेचे आहे,’ असेही देसाई यांनी स्पष्ट केले.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times