मुंबई: पीएमसी बँक घोटाळ्यातील आरोपी प्रवीण राऊत याच्या पत्नीकडून घेतलेले ५५ लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज शिवसेनेचे खासदार यांच्या पत्नी यांनी परत केलं आहे. सक्तवसुली संचालनालयानं () चौकशीसाठी समन्स बजावल्यानंतर वर्षा राऊत यांनी हे पाऊल उचललं आहे.

ईडीच्या सूत्रांकडून ही माहिती मिळाली आहे. त्यानुसार, वर्षा राऊत यांनी एका नातलगाच्या माध्यमातून ईडीला काही कागदपत्रे सादर केली आहेत. त्यात प्रवीण राऊत यांच्या पत्नी माधुरी राऊत यांच्याकडून घेतलेले कर्ज परत केल्याचीही कागदपत्रे आहेत. संजय राऊत यांची निर्मिती असलेल्या ‘ठाकरे’ चित्रपटातून मिळालेल्या उत्पन्नातून त्यांनी हे पैसे परत केले आहेत. वर्षा राऊत या ‘ठाकरे’ चित्रपटाच्या सहनिर्मात्या आहेत.

वाचा:

पीएमसी बँक व एचडीआयएल कर्ज घोटाळ्याची चौकशी करणाऱ्या ईडीच्या पथकानं नोव्हेंबर महिन्यात वर्षा राऊत यांना चार वेळा समन्स बजावले होते. मात्र, त्या ईडीपुढं हजर झाल्या नाहीत. २९ डिसेंबर रोजी त्यांनी ईडीकडून वेळ मागितली होती. त्यानुसार त्या ५ जानेवारी रोजी हजर राहणार होत्या. मात्र, एक दिवस आधीच त्या ईडीच्या कार्यालयात पोहोचल्या होत्या. आता वर्षा राऊत यांनी पाठवलेल्या कागदपत्रांची ईडीकडून तपासणी सुरू असून आवश्यकता भासल्यास त्यांना पुन्हा एकदा चौकशीसाठी बोलावले जाणार आहे.

वाचा:

पीएमसी बँकेला ठगवून एचडीआयलनं मिळवलेले ९५ कोटी प्रवीण राऊत यांच्या माध्यमातून वळवल्याचा आरोप आहे. प्रवीण राऊत हा एचडीआयलची उपकंपनी असलेल्या गुरुआशिष कन्स्ट्रक्शन कंपनीचा माजी संचालक आहे. ईडीच्या माहितीनुसार, प्रवीण राऊत यानं ९५ कोटींपैकी १ कोटी ६० लाख रुपये आपल्या पत्नीच्या खात्यावर ट्रान्सफर केले होते. त्यातील ५५ लाख पुढं वर्षा राऊत यांना देण्यात आले होते.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here