बीजिंग: चीनमध्ये पुन्हा एकदा फैलावत असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. जवळपास एक हजारांहून अधिक करोनाबाधितांवर उपचार सुरू असल्याची माहिती चीनकडून देण्यात आली आहे. चीनच्या उत्तर भागात बाधितांची संख्या वाढत आहे. गुरुवारी चीनमध्ये आठ महिन्यानंतर करोनाच्या संसर्गामुळे पहिल्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

राष्ट्रीय आरोग्य आयोगाने शुक्रवारी सांगितले की, करोनाबाधित एक हजारजणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यातील २६ जणांची प्रकृती गंभीर आहे. मागील २४ तासांत एकूण १४४ नवीन करोनाबाधित आढळले आहेत. बीजिंगजवळील हेबेई प्रांतात सर्वाधिक संसर्ग फैलावत असल्याचे समोर आले आहे. हेबेईमध्ये ९० जणांना करोनाची लागण झाली असल्याचे समोर आले आहे. तर, हेलोंगजिआंग प्रांतात ४८ नवीन प्रकरणे समोर आली आहेत.

वाचा:

देशाबाहेरून आलेल्या नऊजणांना संसर्गाची लागण झाली आहे. त्याशिवाय, क्वारंटाइन धोरणाचे पालन करणे, प्रवासासाठी असलेले निर्बंध आणि इतर उपाययोजना आखूनही दक्षिणेतील गुआंक्सी क्षेत्र आणि उत्तर प्रांतातील शांक्सीमधील स्थानिक स्तरावर संसर्गाची काही प्रकरणे आढळली आहेत.

वाचा:

चीनमध्ये करोनाची आतापर्यंत ८७ हजार ९८८ प्रकरणे आढळली आहेत. त्याशिवाय ४६३५ जणांचा मृत्यू झाला आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे एक पथक करोनाच्या उगम स्रोताची माहिती घेण्यासाठी चीनमध्ये दाखल झाले आहे.

वाचा:

चीनच्या हुबेई प्रातांची राजधानी वुहान शहरात पहिल्यांदा डिसेंबर २०१९ मध्ये करोनाचा संसर्ग आढळला होता. त्यानंतर आणि संपूर्ण जगात करोनाचा फैलाव झाला.

हेबेईतून बीजिंगला जाण्यास बंदी

चीनमध्ये करोनाची लक्षणे न दिसलेल्या बाधितांची संख्या मोजली जात नाही. हेबेई प्रातांत करोनाबाधितांची संख्या वाढत असल्यामुळे राजधानी बीजिंगमध्ये करोनाचा संसर्ग फैलावू नये याची काळजी घेण्यात येत आहे. त्यामुळेच आता हेबेई प्रांतातून बीजिंगमध्ये येण्यास मनाई करण्यात आली आहे. हेबेईतून बीजिंगमध्ये जात असलेल्या नागरिकांना आपण कामानिमित्त बीजिंगला जात असल्याचा पुरावा अधिकाऱ्यांना द्यावा लागत आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here