मुंबई- यांनी दिग्गज गायिका लता मंगेशकर, आशा भोसले आणि नूरजहां यांचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला. हा फोटो शेअर करताना त्याने लिहिले की, हा फोटो किती सुंदर आणि ऐतिहासिक आहे. त्याच्या या फोटोवर एका यूझरने यांच्या विरोधात भाष्य केलं. पण हीच गोष्ट अदनानला आवडली नाही त्याने यूझरला प्रत्युत्तर दिलं.

अदनानने लिहिले की, गप्प बसून मुर्ख दिसणं केव्हाही चांगलं
अदनान सामीच्या पोस्टवर यूझरने लिहिले की, ‘लता मंगेशकरांचा आवाज चांगला आहे असा विचार करण्यासाठी भारतीयांचं ब्रेन वॉश करण्यात आलं आहे.’ यावर अदनान याने उत्तर देताना लिहिले की, ‘माकडाला गुळाची चव काय.. आपल्या प्रत्येक गोष्टीवर प्रश्न उपस्थित करण्यापेक्षा गप्प बसून मुर्ख दिसणं केव्हाही चांगलं.’

विवेक अग्निहोत्री यांनीही केलं अदनानचं समर्थन

दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनीही लता मंगेशकर यांचं समर्थन केलं आहे. त्यांनी यासंबंधी अनेक ट्वीट केली. विवेक यांनी लिहिले की, ‘मी देवाला प्रार्थना करतो की लता मंगेशकर यांचा द्वेष करणारे पुढच्या जन्मी आमच्यासारखे मनुष्य होवोत ज्यांना सुंदरता नक्की काय असते ते कळेल आणि देवत्व नक्की कसं असेल ते त्यांना कळेल. दुसर्‍या ट्वीटमध्ये त्यांनी लिहिले की, माझा सरस्वती आणि दिव्यतेवर विश्वास आहे. याचं एक मुख्य कारण म्हणजे लता मंगेशकर. माझा सैतानावरही विश्वास आहे, याचं कारण म्हणजे लता मंगेशकर यांचा द्वेष करणारे लोक.’

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here