वाचा-
ब्रिस्बेन कसोटीत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण पहिल्याच ओव्हरमध्ये मोहम्मद सिराजने डेव्हीड वॉर्नरची विकेट घेत यजमानांना धक्का दिला. त्यानंतर आठव्या षटकात शार्दुल ठाकूरने मार्कस हॅरिसला ५ धावांवर बाद करत ऑस्ट्रेलियाला दुसरा धक्का दिला. ऑस्ट्रेलियाची सलामीची जोडी १७ धावांवर बाद करत भारतीय गोलंदाजांनी संघाला चांगली सुरूवात करून दिली.
वाचा-
…
वॉर्नर-हॅरीस बाद झाल्यानंतर आणि स्टीव्ह स्मिथ यांनी तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागिदारी केली. ही जोडी भारताकडून पदार्पण करणाऱ्या वॉशिंग्टन सुंदरने फोडली. त्याने स्मिथला ३६ धावांवर बाद केले. स्मिथनंतर आलेल्या मॅथ्यू वेडने लाबुशेनसह चौथ्या विकेटसाठी शतकी भागिदारी केली. पदार्पण करणाऱ्या टी नटराजनने वेडला बाद करत ही जोडी फोडली. दरम्यान लाबुशेनने कसोटीमधील पाचवे शतक पूर्ण केले. वेडला बाद केल्यानंतर नटराजनने लाबुशेनची विकेट घेत ऑस्ट्रेलियाला पाचवा धक्का दिला.
वाचा-
दिवस संपण्याआधी भारताला नव्या चेंडूवर विकेट घेता आली नाही. खेळ संपला तेव्हा कॅमरून ग्रीन २८ तर कर्णधार टीम पेन ३८ धावांवर नाबाद होते. भारताकडून नटराजनने सर्वाधिक दोन तर सिराज, ठाकूर आणि सुंदर यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
वाचा-
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times