ब्रिस्बेन, : रोहित शर्मा पूर्णपणे फिट होऊन ऑस्ट्रेलियामध्ये दाखल झाला खरा, पण त्यानंतर रोहितवर काही जणांनी टीका केली होती. रोहित अजूनही पूर्णपणे फिट नसल्याचे काही टीकाकारांनी म्हटले होते. पण रोहितने या टीकाकारांची बोलतीच बंद केल्याचे पाहायला मिळत आहे. कारण रोहितचा एक भन्नाट व्हिडीओ क्रिकेट विश्वात चांगलाच व्हायरल झाला आहे.

रोहित शर्मा पूर्णपणे फिट नाही आणि त्यामुळे तो चांगले क्षेत्ररक्षण करताना दिसत नाही, अशी टीका रोहितवर करण्यात आली होती. पण आजच्या पाचव्या सामन्यात मात्र रोहितने या टीकाकारांची तोंडं बंद केली. रोहितने आजच्या सामन्यात एक अफलातून झेल पकडला आणि आपल्या कामगिरीतूनच रोहितने टीकाकारांना उत्तर दिल्याचे पाहायला मिळाले आहे.

भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी वेगवान मारा करत होता. त्यावेळी सिराजच्या पहिल्याच षटकातील अखेरचा चेंडू वॉर्नर खेळत होता. सिराजचा चेंडू खेळत असताना वार्नर चकला आणि त्याचा झेल स्लीपमध्ये उडाल्याचे पाहायला मिळाले. हा चेंडू एवढा वेगवान होता की, त्याचे झेलमध्ये रुपांतर करणे सोपे नव्हते. पण रोहितने यावेळी हवेत झेप घेतली आणि हा झेल पकडत भारताला पहिले यश मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला.

भारताविरुद्धच्या चौथ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाने मार्नस लाबुशेनच्या शतकाच्या जोरावर ५ बाद २७४ पर्यंत मजल मारली. चौथ्या सामन्यात भारत चार बदलांसह मैदानात उतरला होता. भारताचे अनुभवी गोलंदाज संघाबाहेर असताना युवा गोलंदाजांनी समाधानकारक कामगिरी करत ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ माघारी पाठवला.

ब्रिस्बेन कसोटीत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण पहिल्याच ओव्हरमध्ये मोहम्मद सिराजने डेव्हीड वॉर्नरची विकेट घेत यजमानांना धक्का दिला. त्यानंतर आठव्या षटकात शार्दुल ठाकूरने मार्कस हॅरिसला ५ धावांवर बाद करत ऑस्ट्रेलियाला दुसरा धक्का दिला. ऑस्ट्रेलियाची सलामीची जोडी १७ धावांवर बाद करत भारतीय गोलंदाजांनी संघाला चांगली सुरूवात करून दिली. पण त्यानंतर मार्नस लाबुशेनने शतक झळकावले आणि संघाला चांगली धावसंख्या उभारून दिली.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here