मुंबई: अमेरिकन अभिनेत्री आणि नॅच्युरोपॅथी फिजिशन हिचा गेल्या महिन्यात रहस्यमयरित्या मृत्यू झाला आहे. जेसिका केवळ ३८ वर्षांची होती. २९ डिसेंबर २०२०रोजी पोर्टलॅंड इथल्या राहत्या घरी ती मृतावस्थेत आढळून आली होती.

” या चित्रपटात काम केलेल्या जेसिकाच्या मृत्यूचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट अद्यापही तिच्या कुटुंबियांना मिळाला नाहीए. अद्यापही तिच्या मृत्यूचं नेमकं कारण समोर येऊ शकलं नाहीए.

जेसिकाची चुलत बहिण सारा सारा वेसलिंग हिनं जेसिकाच्या मृत्यूचा दुजोरा देत ही दु:खद बातमी मीडियासोबत शेअर केली होती. जेसिका रोजच्या प्रमाणे दवाखान्यात गेली होती, इतकंच नाही तर मृत्यू झाला त्या दिवशी ती कुटुंबियांसोबतच होती.सारानं सांगितलं की, जेसिका बाथरुममध्ये गेली होती. खूप वेळ झाला तरी ती बाहेर आली नाही.त्यामुळं तिची आई तिला पाहण्यासाठी बाथरुममध्ये गेली होती. तेव्हा जेसिका बाथरुममध्ये जमिनीवर पडली होती. तसंच जेसिकाला काही दिवसांपासून श्वसनाचा त्रास होत असल्याचीही माहितीही तिच्या कुटुंबियांनी दिली आहे.

जेसिकानं रीस विदरस्पूनसोबत चित्रपट ‘इलेक्शन’मध्ये काम केलं होतं. इतकंच नव्हे तर ती अनेक टीव्हीशोजमध्येही झळकली होती. त्यानंतर तिनं अभिनय क्षेत्राला रामराम ठोकून वैद्यकिय क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला होतो. जेसिकाला १० वर्षांचा मुलगा ऑलिवर आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here