कमी कालावधीत बॉलिवूडमध्ये स्वत:चं वेगळं स्थान निर्माण करणारी आघाडीची अभिनेत्री ठरली आहे. करिअरच्या सुरुवातीला तिलाही नकार पचवावा लागला. पण ती थांबली नाही. ‘नकार मिळाला म्हणजे करिअर संपलं असं होत नाही’, असं ती सांगते.

० स्त्रीकेंद्रित चित्रपटात मोठे अभिनेते काम करण्यास कचरतात असं तुला वाटतं का?– स्त्रीकेंद्रित संहिता असलेल्या चित्रपटात मोजके अभिनेते काम करण्यास तयार होतात. पण हॉलिवूडमध्ये अशा भूमिका मोठे कलाकार अगदी सहज करतात. बॉलिवूडमध्ये अभिनेत्री करतातच की छोट्या भूमिका. मी देखील ‘: द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटात धोनीच्या बायकोची भूमिका केली होती. ती भूमिकाही लहान होती. पण त्या भूमिकेनं मला अभिनेत्री कियारा अडवाणी म्हणून ओळख दिली. बॉलिवूडमधील मोठे अभिनेते स्त्री केंद्रित चित्रपटात काम करतील आणि त्यांना जास्तीतजास्त पाठिंबा देतील, अशी मी आशा करते.

० आज महिलांपुढे नेमकी कोणती मोठी आव्हानं आहेत याविषयी काय सांगशील ?– अभिनेत्री म्हणून काम करताना अर्थपूर्ण चित्रपट मिळवणं हे सर्वात मोठं आव्हान आहे. अशा प्रकारचा एखाद-दुसरा चित्रपट मिळाला म्हणजे झालं असं होत नाही. हल्ली विविध प्रकारच्या भूमिका साकारण्याची संधी अभिनेत्रींना मिळतेय. मानसिकता हळूहळू बदलतेय. प्रत्येक पावलावर महिलांना स्वत:ला सिद्ध करावंच लागतं.

० करिअरच्या सुरुवातीच्या काळात तुला अनेकदा नकार पचवावा लागला का?– ‘फगली’ या चित्रपटानंतर अनेकदा नकाराचा सामना करावा लागला. पण माझ्या आयुष्यातील ते वाईट दिवस होते. मला मिळणाऱ्या भूमिका दुसऱ्या अभिनेत्रीला मिळाल्या. मला विशिष्ट भूमिका हव्या होत्या त्या मिळत नव्हत्या. अनेक निर्मात्यांना भेटले पण; अधीचा चित्रपट चालला नाही म्हणून नकार मिळायचा. पण मी थांबले नाही. नकार मिळाला म्हणजे करिअर संपलं असं होत नाही. ऑडिशन देत राहिले. त्यानंतर ‘धोनी’ या चित्रपटासाठी विचारलं गेलं. या चित्रपटानंतर पुढची सगळी गणितंच बदलून गेली.

० महिलांच्या बाबतीतल्या कोणत्या गोष्टीचा तुला त्रास होतो?– महिलांवर होणारा अन्याय. महिलांच्या बाबतीत कुठलीही वाईट घटना घडली तर ती घटना त्यांच्या आयुष्याचा भाग बनते. आज मुलांची/पुरुषांची मानसिकता बदलणं खूप महत्त्वाचं आहे. त्यांना स्त्रियांचा आदर करायला, त्यांच्याकडे आदरानं बघायला शिकवण्याची गरज आहे. ते काम त्यांच्या आईनेच करायला हवं.

० तुझ्यामते महिला सबलीकरण म्हणजे काय?– प्रत्येक महिला दुसऱ्या महिलेच्या खांद्याला खांदा लावून काम करेल तेव्हाच सगळं बदलेल. महिलांकडे बघण्याची दृष्टीही बदलेल. प्रत्येक महिला दडपण, भीतीशिवाय तिला हवं ते करू शकेल तेव्हा महिला सबलीकरण झालं असं म्हणता येईल. स्वतंत्र असणं म्हणजे जग जिंकण्यासारखं आहे. आपण महिलांना शिक्षित करायला हवं. कारण कुठल्याही समस्येचं मूळ अशिक्षितपणा हे आहे.

संकलन : वेदांगी काण्णव

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here