मुंबई: राज्याचे सामाजिक न्यायमंत्री यांच्यावर झालेला बलात्काराचा आरोप व ड्रग्ज प्रकरणात अल्पसंख्याक मंत्री यांच्या जावयाला झालेल्या अटकेमुळं राष्ट्रवादी काँग्रेस सध्या विरोधकांच्या निशाण्यावर आहे. भाजपच्या नेत्यांनी मुंडे व मलिक यांच्यासह राष्ट्रवादीवर टीकेची झोड उठवली आहे. माजी खासदार यांनी राष्ट्रवादीवर गंभीर आरोप केला आहे.

वाचा:

‘नरेंद्र मोदी यांच्यामुळं लोकांना डिजिटल पेमेंट करायची सवय झाली आणि डिजिटल पेमेंटमुळे नवाब मलिक यांचा जावई ड्रग्जच्या लफड्यात पकडला गेला. राष्ट्रवादीत चाललंय काय? जितके गुन्हेगार राष्ट्रवादी पक्षात आहेत, तितके एखाद्या तुरुंगातही नसतील, असं नीलेश राणे यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

मुंबईचे सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी काल ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानी जाऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष यांची भेट घेतली होती. ही भेट नेमकी कोणत्या कारणासाठी झाली होती याबाबत काहीही कळू शकलेलं नाही. मात्र, नीलेश राणे यांनी त्यावर आश्चर्य व्यक्त केलं आहे. ‘महाराष्ट्रात नेमकं काय चालू आहे? एका बलात्काराच्या प्रकरणासाठी मुंबईचे सहपोलीस आयुक्त एका पक्षाच्या नेत्याला कसे भेटू शकतात. तेही त्यांच्या घरी? हा तर प्रकरण झाकायचा अजेंडा दिसतो. अशाने लोकांचा पोलिसांवरील विश्वास उडेल. सामान्य लोकांसाठी देखील ही सुविधा आहे का हे मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी सांगावं,’ असंही त्यांनी एका ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here