मुंबई टाइम्स टीम

‘’ हा कार्यक्रम नेहमीच चर्चेत असतो. सध्या केबीसीचं १२वं पर्व सुरु असून ते शेवटच्या टप्प्यात आलं आहे. पण, पुढील पर्वात हॉट सीटवर नसतील, असं बोललं जातंय. नुकतंच अमिताभ यांनी लिहिलेल्या ब्लॉगमध्ये निवृत्तीचा उल्लेख केल्यामुळे ते केबीसीची पुढची पर्व करणार नाहीत अशा चर्चा सुरु झाल्या आहेत.

हे त्यांच्या ब्लॉगच्या माध्यमातून मनातील अनेक गोष्टी सर्वांसमोर मांडतात. ‘मी आता थकलो आहे आणि निवृत्त झालो आहे.… मी सर्वांची माफी मागतो… ‘कौन बनेगा करोडपती’च्या शेवटच्या भागाचं चित्रीकरण खूपच लांबलं.… कदाचित भविष्यात पुन्हा चांगलं काम करु शकेन. पण लक्षात ठेवा काम हे काम असतं आणि ते मन लावून करायला हवं’, असं त्यांनी ब्लॉगमध्ये लिहिलं आहे. पुढे ते म्हणतात की, ‘चित्रीकरणाच्या शेवटच्या दिवशी खूप सारं प्रेम मिळालं.… पण शेवटी सगळ्या गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या असतात. थांबण्याची इच्छा नाही, पण थांबावं लागेल. मी आशा करतो की हे सगळं पुन्हा होईल. सेटवरील क्रू आणि टीममधील सदस्य खूप मेहनती आहेत. त्यांच्यामुळे सेटवर काम करण्यास प्रोत्साहन मिळतं. सेटवर सगळ्यांनी माझी काळजी घेतली. गेले अनेक दिवस आपण एकत्र काम करत आहोत. ते क्षण माझ्या कायम आठवणींमध्ये राहतील. तुम्हा सर्वांचे आभार’. अमिताभ यांचा ब्लॉग वाचल्यावर अनेकांना ‘कौन बनेगा करोडपती १२’ हा अमिताभ यांच्या सूत्रसंचालनाचा अखेरचा सीझन तर नाही ना? असा प्रश्न पडला आहे. अमिताभ यांना आणखीन काही सीझनचं सूत्रसंचालन करताना पाहण्याची इच्छा चाहत्यांनी व्यक्त केली आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here