कोलकाता : आगामी पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आलाय. याच दरम्यान तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि बशीरहाट मतदारसंघाच्या खासदार एका वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आल्या आहेत. नुसरत जहाँ यांनी ‘भाजप हिंदू – मुस्लिम दंगल घडवणारा पक्ष’ असल्याचं सांगत ‘हा राजकीय पक्ष कोव्हिडपेक्षाही जास्त धोकायदायक आहे’ असं वक्तव्य केलंय. सत्तेत आले तर मुस्लिमांची उलट दिवस मोजावे लागतील, असंही त्यांनी म्हटलंय.

पश्चिम बंगालच्या उत्तर २४ परगनाच्या मुस्लीमबहुल भाग असलेल्या देगंगा इथं एका रक्तदान शिबीर कार्यक्रमात नुसरत जहाँ यांनी सहभाग घेतला होता. यावेळी आपल्या भाषणात ‘तुम्ही तुमचे डोळे उघडे ठेवा… कारण तुमच्या आजुबाजुला असे लोक असू शकतात जे करोनापेक्षाही जास्त धोकादायक आहेत. तुम्हाला माहीत आहे, करोनापेक्षाही जास्त काय धोकादायक आहे… ते भाजप आहे. कारण त्यांना आपल्या संस्कृतीबद्दल काहीही माहिती नाही, कारण त्यांना मानवता समजू शककत नाही, ते कठीण परिश्रमाच्या मूल्यांना समजू शकत नाहीत. त्यांना केवळ व्यापार माहीत आहे. त्यांच्याकडे अपार संपत्ती आहे, आणि हीच संपत्ती ते सगळीकडे उधळत आहेत’ असं जहाँ यांनी म्हटलं.

भाजप सारखा धोकादायक व्हायरस जवळपास फिरतोय. हा पक्ष धर्माधर्मात भेदभाव आणि व्यक्ती-व्यक्तींत दंगे घडवून आणतो. जर भाजप सत्तेत आले तर मुस्लिमांची उलट मोजणी सुरू होईल’ असंही जहाँ यांनी म्हटलं होतं.

भाजपकडून पलटवार

नुसरत जहाँ यांच्या या वक्तव्यावर भाजप आयटी सेल प्रमुख यांनी आणि त्यांच्या पक्षावर मुस्लिमांना आकृष्ठ करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केलाय. ‘पश्चिम बंगालमध्ये लसीकरणावर सर्वात घाणेरडं राजकारण सुरू आहे. अगोदर ममता बॅनर्जी यांच्या मंत्रिमंडळातील सद्य मंत्री सिद्धिकुला चौधरी यांनी लस घेऊन जाणारा ट्रक रोखला. आता तृणमूल खासदार मुस्लीमबहुल भाग असलेल्या देगंगा इथं निवडणूक प्रचार करताना भाजपची तुलना करोना व्हायरसशी करत आहेत. परंतु, ममता बॅनर्जी मात्र मूग गिळून गप्प आहेत’ असं अमित मालवीय यांनी म्हटलंय.

पश्चिम बंगालमध्ये याच वर्षी मार्च – एप्रिल महिन्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या आणि केंद्रातील सत्ताधारी भाजपचा इथे थेट सामना होताना दिसणार आहे. याच पार्श्वभूमीवर आरोप-प्रत्यारोपांना जोर आलाय.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here