रेणू शर्मा पुढे म्हणतात, ‘जर मी चुकीची असेन तर मग इतके सारे लोक आतापर्यंत पुढे का येऊ शकले नाहीत. मी माघार घेतली तरी देखील माझा मला स्वत:ला अभिमान असणार आहे. याचे कारण म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात मी एकटी मुलगी लढत होते. तसे पाहिले तर मी कोणत्याही पक्षाचे नाव घेतलेले नाही आणि आता मला हटवण्यासाठी आणि खाली पाडण्यासाठी इतक्या लोकांना यावे लागत आहे. आता तुम्हाला जे काही लिहायचे आहे ते बसा आणि लिहा.
क्लिक करा आणि वाचा-
‘आम्हालाही या महिलेने गळ घातली’
या महिलेने आम्हालाही गळ घातल्याची तक्रार भाजपा आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांत केली आहे. भाजपचे माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी देखील संबंधित महिलेने आपल्यालाही अडकवण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार केली आहे. हेगडे हे फडणवीस यांचे निकटवर्तीय आहेत. आपल्याला या महिलेने दूरध्वनी केले असा आरोप मनसेचे एक पदाधिकारी मनीष धुरी यांनीही केला आहे. या बरोबरच जेट एअरवेजच्या एका माजी अधिकाऱ्याने या महिलेबाबत अशाच प्रकारची तक्रार केली आहे.
क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times