सीडीसीच्या या इशाऱ्यानंतर प्रशासनाची चिंता आणखीच वाढली आहे. करोनाबाधितांच्या मृत्यूमुळे अमेरिकेतील सरासरी आर्युमानात एक वर्षाची घट झाली आहे. सरत्या २०२० वर्षात ७७.४८ इतके आर्युमान नोंदवण्यात आल्याची माहिती संशोधकांनी दिली. वर्ष २००३नंतरचे हे सर्वाधिक कमी आर्युमान असल्याची माहिती त्यांनी दिली.
वाचा:
वाचा:
अमेरिकेत करोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढत असल्यामुळे आरोग्य व्यवस्थेवरील ताण वाढला आहे. अनेक राज्यातील बाधितांची संख्या दुप्पट झाली आहे. या महिन्यातच अमेरिकेत सुमारे ३० लाखजणांना करोनाची बाधा झाली आहे. अमेरिकेत करोनाच्या संसर्गाला अटकाव करण्यासाठी लसीकरण सुरू करण्यात आले आहे. फायजर-बायोएनटेक आणि मॉडर्नाने विकसित केलेली लस या लसीकरण मोहीमेत दिली जात आहे. आतापर्यंत ११.१ दशलक्ष नागरिकांना पहिला डोस देण्यात आला आहे.
वाचा:
लसीकरणाची क्षमता वाढवण्यावर भर
अमेरिकेतील अनेक राज्यांमध्ये लसीकरण वेगाने होण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. दररोज अधिकाधिक नागरिकांना लस देण्यासाठी विविध पातळींवर नियोजन सुरू आहे. लॉस एंजलिसमधील डॉग्जर स्टेडियममध्ये लस देण्यात येणार आहे. त्यामुळे दररोज किमान १२ हजारजणांना लस देता येणार आहे. अमेरिकेतील हे सर्वात मोठे लसीकरण केंद्र असल्याचा दावा महापौरांनी केला आहे. त्याशिवाय न्यूयॉर्कमध्येही यांकी स्टेडियममध्ये लसीकरण सुरू करण्यात येण्याची दाट शक्यता आहे. हवाईमध्ये दोन नवीन लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहेत. येत्या काही दिवसांत दररोज तीन ते चार हजारजणांना लस देता येणे शक्य होणार आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times