नुकत्याच जया दाताच्या दवाखान्यात जाताना दिसल्या. त्या गाडीतून खाली उतरताच छायाचित्रकारांनी त्यांचे फोटो काढायला सुरुवात केली. पण अशाप्रकारे जया यांचे फोटो काढणं त्यांना महागात पडेल याची त्यांना कोणतीच कल्पना नव्हती.
जया बच्चन यांना त्यांचे फोटो काढल्याबद्दल राग आला. यानंतर लगेच गाडीतून चालक बाहेर आला आणि त्याने फोटो न घेण्याबद्दल सांगितलं. पण तोपर्यंत जया यांचा रागाचा पारा चढला होता. ‘तुम्ही इथे पण येता का?’ असा रागात प्रश्न त्यांनी विचारला. यावर उत्तर देताना छायाचित्रकार म्हणाले की, ‘तुमची गाडी पाहून आम्ही इथे आलो.’ यानंतर छायाचित्रकारांनी जया बच्चन यांची माफी मागितली.
करण जोहरने श्वेता आणि अभिषेक बच्चन यांना त्याच्या कॉफी विथ करण शोमध्ये जया बच्चन यांच्या अशा वागण्याविषयी विचारले होते. यावर बोलताना अभिषेक म्हणाला की, ‘जया बच्चन या क्लॉस्ट्रोफोबिक (claustrophobic) आहेत. ही एक मानसिक स्थिती आहे ज्यात गर्दी पाहून एखादी व्यक्ती अचानक अस्वस्थ होते. कधीकधी रागही येतो. असं त्यांना बाजार, वाहनांची गर्दी पाहून किंवा लिफ्टमध्येही होतं. त्यांना कोणी ढकलणं किंवा स्पर्श करणं या गोष्टीही अजिबात आवडत नाहीत. याशिवाय कॅमेऱ्याचा फ्लॅश डोळ्यात जातो त्याचाही त्यांना त्रास होतो.’
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times