रंग माझा वेगळा मालिकेतल्या या सुखद वळणाविषयी सांगताना दीपाची भूमिका साकारणारी रेश्मा शिंदे म्हणाली, ‘दीपाला लहानपणापासूनच आईचं प्रेम मिळालं नाही. त्यामुळे राधाईला आई मानत तिने ते प्रेम मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर कार्तिक तिच्या आयुष्यात आला आणि सर्वस्व झाला.
अशक्य वाटत असणारी प्रत्येक गोष्ट शक्य होत गेली. आता तर बाळाची चाहूल लागली आहे. त्यामुळे दीपा खूपच आनंदात आहे. आमच्या सेटवरही आनंदाचं वातावरण आहे. यापुढील भाग शूट करण्यासाठी आम्ही सगळेच खूप उत्सुक आहोत.’
‘रंग माझा वेगळा’ मालिकेतलं हे वळण उत्कंठा वाढवणारं असलं तरी दीपाची ही गूड न्यूज इनामदार कुटुंबात कश्या पद्धतीने स्वीकारली जाणार हे मालिकेच्या पुढील भागांमधून उलगडेल. त्यासाठी पाहायला विसरु नका रंग माझा वेगळा सोमवार ते शनिवार रात्री ८ वाजता फक्त स्टार प्रवाहवर.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times