मालिकेतली गोष्ट ही आर्याच्या भक्तीची आणि काळुबाईच्या शक्तीची आहे. या मालिकेत आर्याची काळुबाईवर असलेली भक्ती तिला सर्व संकटांतून मार्ग काढण्यासाठी मदत करते.
१७ जानेवारीला ‘आई माझी काळुबाई’चा महाएपिसोड संध्याकाळी ७ वाजता प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. अमोघच्या आयुष्यात आणि पाटील वाड्यात अमोघची पूर्वाश्रमीची प्रेमिका सई आलेली आहे. तिच्या येण्यानं आर्या आणि अमोघ यांच्या नात्यात अंतर येतं.
दरम्यान दैत्याचा अंश असलेला विराट आर्याला संपवण्यासाठी हरतर्हेने प्रयत्न करतो आहे. किंक्रांतीच्या दिवशी विराटची ताकद अफाट वाढली असून त्या दिवशी आर्याला कोणीही मारू शकत आणि म्हणूनच विराट आर्याला मारायची योजना आखतो.
विराट आर्याला मारू शकेल का की आर्यावर आलेल्या या जीवघेण्या संकटातून काळुबाई आर्याचं रक्षण करेल? हे जाणून घेण्यासाठी पाहा, ‘आई माझी काळुबाई’ महाएपिसोड, १७ जानेवारी संध्या. ७ वा. फक्त आपल्या सोनी मराठी वाहिनीवर.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times