Update: महाराष्ट्रात करोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील इयत्ता २७ जानेवारीपासून सुरु करण्यासाठी राज्य सरकारने हिरवा कंदिल दाखवला आहे. अंतिम निर्णय मात्र स्थानिक प्रशासनावरच सोडण्यात आला आहे. स्थानिक परिस्थितीनुसार तेथील स्थानिक प्रशासनाने याबाबतचा निर्णय घ्यावयाचा आहे. अर्थात यासाठी पालकांची संमती, शिक्षकांची आरटीपीसीआर चाचणी आदी सर्व यापूर्वीचे नियम यापुढेही लागू राहणार आहेत. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे.

वर्षा गायकवाड म्हणाल्या की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर हा शाळा उघडण्यासंबंधीचा प्रस्ताव मांडण्यात आला. करोनासंदर्भातली खबरदारीच्या सर्व उपाययोजना अंमलात आणून, सर्व नियम पाळूनच शाळा सुरू करा अशा सूचनाही यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत.

गायकवाड म्हणाल्या, ‘आज शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून ५ वी ते ८ वी च्या शाळा सुरू करण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना आम्ही विनंती केली होती आणि त्यांनी ती विनंती मान्य करुन येत्या २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवी पर्यंतच्या शाळा सुरू करण्यासंदर्भात निर्णय घेतला आहे. हा निर्णय घेत असताना करोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती पूर्वतयारी करणे, स्थानिक प्रशासनाने तयारीची जबाबदारी घेणे, पालकांची संमती आणि शिक्षकांची आरटीपीसीआर टेस्ट करण्यात येणार आहे. यासंदर्भातील विविध SOP येत्या काळात आम्ही निर्गमित करू.’

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here