ब्रिस्बेन, : ऑस्ट्रेलियाच्या प्रेक्षकांना आता आवरण्याची गरज आहे. कारण सिडनीनंतर पुन्हा एकदा ब्रिस्बेनमध्ये भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला शिवीगाळ करण्यात आली आहे. त्याचबरोबर या सामन्यात पदार्पण करणाऱ्या वॉशिंग्टन सुंदरबाबतही स्टेडियममधील प्रेक्षकांनी यावेळी अपशब्द वापरल्याचे पाहायला मिळाले आहे. आता या प्रेक्षकांवर काय कारवाई केली जाते, याकडे क्रिकेट विश्वाचे लक्ष लागलेले आहे.

सिराजने चौथ्या कसोटी सामन्यातही भेदक गोलंदाजी करत ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरला आपले शिकार केले. त्यानंतर स्टेडियममधील ऑस्ट्रेलियाच्या चाहत्यांनी सिराजला डिवचायला सुरुवात केली. ब्रिस्बेनच्या क्रिकेट मैदानात सेक्शन २१५ आणि २१६ येथील प्रेक्षक सिराजबाबत अपशब्द वापरत होते. त्याचबरोबर सिराजला यावेळी शिवीगाळ आणि वर्णद्वेषी टीकाही सहन करावी लागली सिराजला काही चाहत्यांनी ‘ग्रब’ असेही म्हटले, याचा अर्थ तु अजून बच्चा आहे, असे त्यांना म्हणायचे होते. त्याचबरोबर के सेरा-सेरा या गाण्याऐवजी प्रेक्षक के सिराज-सिराज… असेही यावेळी म्हणत होते.

आपला पहिलाच सामना खेळणाऱ्या सुंदरलाही यावेळी चाहत्यांनी अपशब्द वापरल्याचे पाहाला मिळाले. सुंदरने यावेळी ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज स्टीव्हन स्मिथला बाद केले. त्यानंत सुंदर जेव्हा सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करत होता, तेव्हा सुंदरबाबत प्रेक्षकांनी शिवीगाळ केल्याचे पाहायला मिळाले. आतापर्यंत भारतीय संघाने याबाबतची अधिकृत तक्रार केली नसल्याचे समजते आहे. पण सामन्याच्या दुसऱ्या दिवशी या चाहत्यांना आता काय शिक्षा होते, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

सिडनी येथील तिसऱ्या कसोटी सामन्यातही सिराज आणि भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा यांना शिविगाळ करण्यात आली होती. त्याचबरोबर त्यांच्याविरोधात वर्णद्वेषी टीकाही करण्यात आली होती. या प्रकरणाची चौकशी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद करत असल्याचे समजते आहे. त्याचबरोबर दोषींविरोधात कडक कारवाई करण्याचे आश्वासन ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट मंडळाने दिले आहे. पण अजूनपर्यंत या व्यक्तींवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यानंतर आता ब्रिस्बेनमधील हे प्रकरण आता समोर आले आहे. त्यामुळे आता या प्रेक्षकांवर कधी कारवाई करणार, असा सवाल चाहते विचारु लागले आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here