ब्रिस्बेन: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा कसोटी सामना ब्रिस्बेन येथे सुरू आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाने ५ बाद २७४ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून मार्नस लाबुशेनने शतकी खेळी केली. तर भारताकडून पदार्पण करणाऱ्या टी नटराजन याने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या.

वाचा-

टीम पेनने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताकडे अनुभवी युवा गोलंदाजांची कमतरता असतान देखील त्यांनी ऑस्ट्रेलियाच्या सलामीच्या जोडीला १७ धावांवर माघारी पाठवले. मोहम्मद सिराजने डेव्हिड वॉर्नरची तर शार्दुल ठाकूरने मार्कस हॅरिसची विकेट घेतली. त्यानंतर वॉशिंग्टन सुंदरने स्टीव्ह स्मिथला माघारी पाठवले. टी नटराजनने पदार्पणातच मॅथ्यू वेड आणि लाबुशेनची विकेट घेत शानदार कामगिरी केली.

वाचा-

पहिल्या दिवसाचा खेळ संपण्यासाठी काही षटके शिल्लक असताना टी नटराजनच्या एक चेंडू ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेनने खेळण्याचा प्रयत्न केला. पण तो थेट ()च्या हातात गेला. त्यावर पंतने जोरदार अपील केली. भारतीय संघातील अन्य कोणत्याही खेळाडूने अपील केली नाही. चेंडू पेनच्या बॅटला स्पर्श करून आला असे पंतला वाटले. पण गोलंदाज नटराजन आणि स्लिपमध्ये उभे असलेले कर्णधार अजिंक्य रहाणे आणि उपकर्णधार रोहित शर्मा, शुभमन गिल आणि चेतेश्वर पुजारा यांना कोणालाच तसे वाटले नाही.

वाचा-

पंतने कर्णधाराला बाद असल्याचे पटवण्याचा प्रयत्न केला. पण त्याचे बोलणे रहाणेने हसण्यावारी नेले. रोहित शर्मा देखील त्याने केलेल्या अपीलवर हसू लागला. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने या घटनेचा व्हिडिओ शेअर केला. हा व्हिडिओ आयसीसीने देखील त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केला.

वाचा-

पाहा व्हिडिओ-

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here