मुंबई: राज्यात उद्या १६ जानेवारी पासून कोरोना सुरु होत आहे. त्यासाठी केंद्र शासनाच्या निर्देशानुसार २८५ केंद्रांवर तयारी पूर्ण झाली आहे. प्रत्येक केंद्रावर १०० प्रमाणे सुमारे २८ हजार ५०० आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरणाचे नियोजन करण्यात आले आहे.
ज्यांना लस देण्यात येणार आहे त्यांना आज सायंकाळपर्यत मेसेज पाठविण्याचे काम सुरू होते. या मेसेजमध्ये संबंधित व्यक्तीला किती वाजता, कोणत्या केंद्रावर, कुठल्या कंपनीची लस दिली जाणार याची माहिती देण्यात आली आहे, असे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी दिली.

एका लसीकरण केंद्रावर लसीकरणासाठी ५ जणांचे पथक तैनात करण्यात आले आहे. दरम्यान, लसीकरणाच्या शुभारंभ प्रसंगी देशातील अन्य राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातील कूपर हॉस्पिटल, मुंबई आणि जालना जिल्हा रुग्णालयातील लसीकरण सत्राची पंतप्रधान दूरचित्रवाणीद्वारे माहिती घेतील. यादोन्ही ठिकाणी दूरचित्रवाणी संवादाची यंत्रणा तयार करण्यात आली आहे.

राज्याला कोव्हीशिल्ड व्हॅक्सीनचे ९.६३ लाख डोसेस व कोव्हॅक्सिन लशीचे २०,००० डोसेस प्राप्त झालेले असून ते सर्व जिल्हयांपर्यंत पोहोचविण्यात आले आहेत.

कोव्हॅक्सीन लस ही राज्यातील ६ ठिकाणी देण्यात येणार आहे. त्यामध्ये ४ वैद्यकीय महाविद्यालये (मुंबई, औरंगाबाद, सोलापूर आणि नागपूर) व २ जिल्हा रुग्णालयांचा (पुणे आणि अमरावती) समावेश आहे. दररोज सकाळी नऊ ते सायंकाळी पाच यावेळेत लसीकरण केले जाईल.

कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी योग्य नियोजन करा- डॉ. नितीन राऊत
कोरोनाप्रतिबंधक लसीकरण मोहीमेंतर्गत आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांना उद्या शनिवार, दिनांक १६ जानेवारी, रोजी नागपूरमधील पाचपावली येथील महानगर पालिकेच्या आरोग्य केंद्रात कोव्हॅक्सीन डोस देऊन आरंभ होणार आहे. लसीकरणासाठी प्रत्येक केंद्रावर आवश्यक कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून, नोंदणी केलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीकरणासाठी उपस्थित रहावे अशा सूचना पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिल्या आहेत.

क्लिक करा आणि वाचा-
नागपूरमधील पाचपावली येथील महापालिकेच्या आरोग्य केंद्रात पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या उपस्थितीत लसीकरण मोहीमेचा आरंभ होणार आहे.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here