मुंबईः करोनाच्या लढाईतील महत्त्वाचा टप्पा म्हणजे लसीकरण. आज लसीकरणाच्या देशव्यापी मोहिमेला सुरुवात होत आहे. राज्यात आज २८५ केंद्रावर प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा आज प्रारंभ होणार आहे. प्रत्येक केंद्रावर शंभर या प्रमाणे २८ हजार ५०० लाभार्थ्यांना दिवसभरात लस दिली जाणार आहे, अशी माहिती राज्य लसीकरण विभागातर्फे देण्यात आली.
>> पुणे शहरातील एकूण आठ लसीकरण केंद्रांवर प्रत्येकी शंभर नोंदणीकृत लाभार्थ्यांना लस देण्यात येणार आहे
>> ठाणे जिल्ह्यात पहिल्या दिवशी २,३०० लाभार्थींचे लसीकरण होणार आहे.
>> मुंबईत सुरुवातीला दररोज सरासरी ४ हजार जणांचे लसीकरण करण्यात येणार आहे.
>> कोविडप्रतिबंधात्मक राज्यव्यापी लसीकरण मोहिमेचा प्रारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबई महापालिकेच्या वांद्रे-कुर्ला संकुलातील कोविड सुविधा केंद्रामध्ये होणार आहे.
>> देशव्यापी मोहिमेचा प्रारंभ सकाळी १०.३० वाजता विलेपार्ले स्थित डॉ. आर. एन. कूपर रुग्णालयात दृकश्राव्य माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times