छोट्या मुलांच्या आधार कार्डला बाल आधार सुद्धा म्हटले जाते. हे आधार सर्वसामान्या आधार कार्डसारखे नसते तर ते कार्ड निळ्या रंगाचे असते. जवळच्या आधार कार्ड केंद्रावर जाऊन ते बनवले जाऊ शकते. हे आधार कार्ड बनवण्यासाठी मुलाच्या जन्माचा दाखला आवश्यक आहे. हे आधार कार्ड बनवण्यासाठी छोट्या मुलाचा अंगठा लागणार नाही. पाच वर्षांपर्यंत मुलांचे बायोमेट्रिक विकसित होत नाही, त्यामुळे छोट्या मुलांना यातून वगळण्यात आले आहे. पाच वर्ष पूर्ण झालेल्या मुलाचा अंगठा घेतला जातो. त्यात फिंगरप्रिंट आणि आयरिस स्कॅनचा समावेश असतो. पाच वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्याच्या आधार कार्डमध्ये काहीही बदल केला जात नाही. परंतु, त्याला १५ वर्ष पूर्ण झाल्यानंतर बायोमेट्रिक अपडेट करणे गरजेचे आहे. आधार कार्डच्या रेकॉर्डमध्ये डेटा फायनल डेटा मानला जातो.
पाच वर्षाखाली मुलाचे आधार कार्ड बनवायचे असेल तर त्या मुलाचा एक फोटो लागेल. तसेच मुलाचा जन्म दाखला तसेच पालकांचे आधार कार्ड आवश्यक आहे. पाच वर्षापेक्षा अधिक असेल तर मुलाच्या शाळेचा दाखला, शाळा प्रमाणपत्र किंवा बोनाफाईड यापैकी एक आवश्यक आहे.
१५ वर्ष वय असल्यास फिंगरप्रिंट्स, आयरिस स्कॅन आणि फोटो लागणार आहे. किंवा १५ वर्षापेक्षा वय कमी असल्यास डेटा अपडेट करावा लागणार आहे. जवळच्या आधार कार्ड केंद्रावर जाऊन फॉर्म भरल्यानंतर मुदतीच्या कालावधीत आधार कार्ड जारी केले जाते.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times