मुंबईः माजी खासदार यांच्या डोक्यावर परिणाम झालाय, अशी टीका उपमुख्यमंत्री यांनी केली होती. अजित पवारांनी केलेल्या या टीकेनंतर निलेश राणेंनीही यावर प्रत्युत्तर करत पवारांवर निशाणा साधला आहे.

यांच्यावर झालेल्या आरोपानंतर निलेश राणे यांनी प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेसला लक्ष्य केलं होतं. यावर प्रतिक्रिया देताना पवारांनी निलेश राणे काहीही बोलतात, त्यावर मी काय बोलायचे? पण एक सांगतो त्यांच्या डोक्यावर परिणाम झालाय, अशी टीका पवारांनी केली होती. यावर प्रत्युत्तर देताना राणेंनी एक ट्विट करत अजित पवारांना इशाराच दिला आहे.

फार कमी नेते आहेत की ज्यांना महाराष्ट्रात अनेक वर्ष मंत्रीपजे मिळाली. मात्र, तरीपण महाराष्ट्राच्या विकासामध्ये काही परिणाम झाला नाही, त्यामध्ये अजित पवारांचे नाव घ्यावं लागेल, असं ट्विट निलेश राणेंनी केलं आहे. त्याचबरोबर, अजित पवार भाषा नीट करा तुमची नाहीतच हाच निलेश राणे एक दिवस तुमची घमेंड उतरवल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

काय म्हणाले होते निलेश राणे?

नरेंद्र मोदी यांच्यामुळं लोकांना डिजिटल पेमेंट करायची सवय झाली आणि डिजिटल पेमेंटमुळे नवाब मलिक यांचा जावई ड्रग्जच्या लफड्यात पकडला गेला. राष्ट्रवादीत चाललंय काय? जितके गुन्हेगार राष्ट्रवादी पक्षात आहेत, तितके एखाद्या तुरुंगातही नसतील, असं निलेश राणे यांनी म्हटलं आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here