आज देशभरात करोनाच्या लसीकरणाला सुरुवात झाली आहे. राज्यातही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते करोना लसीकरणाला प्रारंभ झाला. यावेळी मुंबई महापालिकेच्या बीकेसी येथील लसीकरण केंद्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावणरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत करोना लसीकरणाची सुरुवात झाली. या सोहळ्यात मुख्यमंत्र्यांनी जनतेशी संवाद साधला आहे.
‘ते आठवल्यावर अंगावर शहारे येतात, काहीच हाती नसताना आपण लढत होतो. तुम्ही सर्व होते तुमच्यामुळं कोविड सेंटर ओस पडले आणि ते तसेच राहुदेत. सुविधा असतील काही काही सुविधांचा उपयोग न होणं हे देखील चांगलंच असतं,’ असंही मुख्यमंत्री ठाकरे यांनी म्हटलं आहे.
‘लसीकरणाची आता सुरुवात होतेय. सगळ्यांना लस मिळेपर्यंत अजून काही महिने लोटतील. या लसीचा प्रभाव किती राहणार हे कळेपर्यंत एक- एक दिवस गेल्यानंतर कळणार आहे. पण आपल्या तोंडावर असलेले मास्क ही उत्तम लस आहे. लस घेतल्यानंतरही मास्क हा वापरावाच लागेल,’ अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
‘करोनाचा शेवट करायचा आहे. करोनाचा शेवट आपण जोपर्यंत करत नाही. तोपर्यंत ज्याकाही सूचना आहेत त्यांचं काटेकोरपणे पालन करावं,’ असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times